पारंपारीक घोंगडी निर्मिती व्यवसायाला उतरती कळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 06:25 PM2019-03-30T18:25:00+5:302019-03-30T18:25:26+5:30

सिंदखेड राजा: हातमागावर घोंगडी तयार करण्याची मातृतीर्थ सिंदखेड राजाची धनगर समाजाची कला आज लूप्त होण्याच्या मार्गावर आहे

Traditional blanket making business slow down | पारंपारीक घोंगडी निर्मिती व्यवसायाला उतरती कळा

पारंपारीक घोंगडी निर्मिती व्यवसायाला उतरती कळा

Next

- काशिनाथ मेहेत्रे
सिंदखेड राजा: हातमागावर घोंगडी तयार करण्याची मातृतीर्थ सिंदखेड राजाची धनगर समाजाची कला आज लूप्त होण्याच्या मार्गावर आहे. सिंदखेड राजातील लघू उद्योग म्हणून या व्यवसायाकडे पूर्वी बघितले जायचे. एका दिवसात २० ते २२ घोंगड्यांची निर्मिती होणारा येथील व्यवसाय डबघाईस आला आहे. या व्यवसायाचे पुर्नरुजीवन करण्याची गरज आहे.  
शहरामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाज बांधवांचा शेतीचा व्यवसाया  सोबत मेंढ्या पाळण्याचा जोडधंदा वडिलोपार्जीत होता. तर मेंढराच्या  लोकरपासून ते घोंगडी बनवीण्याचा लघु उघोग प्रत्येकाच्या  घरा-घरा समोर सुरु असल्याचे दिसत होते. परंतु जंगलावर मोठ्या प्रमाणात शेती काढली गेली पर्यायाने जंगल कमी होत गेली. धनगर समाजाचे हजारो मेंढ्याचे  कळप चरायाला जंगल नसल्या मुळे  कमी झाले. त्याच बरोबर घोंगडी या लघु उघोगाला उतरती कळा लागली असून युवकांनी त्या व्यवसाया कडे पाठ फिरवल्यामुळे  हा व्यवसाय बुडण्याच्या मार्गावर आहे.

 
घोंगडीला मागणीच नाही!
मेंढ्या पासून अनेक प्रकारचे फायदे  आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे मेंढ्याच्या केसापासून शहरात घोंगड्या बनवण्याचा लघु उघोग चांगल्या  प्रकारे चालत होता. पूर्वी पावसाचे प्रमाण चांगले होते. तेंव्हा लोक  पावसापासून संरक्षणासाठी  घोंगड्याचा वापर करायचे. अंगावर पीत्तआले व घोंगडी अंगावर घेऊन झोपले तर पीत्त नाहीसे होत असे. घोंगडीचा वापर प्रत्येकांच्या घरात होत होता. त्यामुळे घोंगडीला चांगली  मागणी सुध्दा होती. मात्र आता घोंगडीला मागणीच राहिली नाही. 

 
शासनाने या उघोगासाठी  प्रोत्साहन  देण्याची गरज

धनगर समाज बांधवांना या लघु उघोगातून प्रपंच चालविण्यासाठी चांगल्या  प्रकारची मदतच होत होती. हा व्यवसाय मेहणतीने समाज बांधव करत होते. परंतु मेंढरांची संख्या कमी झाल्याचा परिणाम या उद्योगाव झाला आहे. सध्या शहरात भिमराव पुंजाजी भोजने व त्यांचा मुलगा अर्जून भोजने  हे दोघेच घोंगडी बनवीण्याचे काम करत  असून शासनाने या उघोगासाठी  प्रोत्साहन  देण्याची गरज आहे. प्रोत्साहन दिल्यास बेरोजगारांना दिलासा मीळेल, अशी अपेक्षा घोंगडी बनविणाºयांनी व्यक्त केली.

Web Title: Traditional blanket making business slow down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.