शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर एक्सप्रेसखाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 01:05 PM2018-06-10T13:05:05+5:302018-06-10T17:29:12+5:30

शेगाव जि. बुलडाणा : चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 11. 30 वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली.

Three women died at shegaon railway station Chennai-Jodhpur express | शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर एक्सप्रेसखाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

शेगाव रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर एक्सप्रेसखाली चिरडून तीन महिलांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देअपघातातील महिला नांदुरा येथील रहिवाशी असल्याचे समजते.भुसावळ पॅसेंजर मध्ये चढन्याच्या प्रयत्नात त्यांना चेन्नई एक्सप्रेस दिसला नाही. त्यांच्याकडे शेगाव नांदुरा असे भुसावळ पॅसेंजर चे तिकिट पोलिसांना सापडले.

शेगाव जि. बुलडाणा : चेन्नई - जोधपूर एक्सप्रेस खाली चिरडून तीन प्रवाशी महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ११.३० वाजता शेगाव रेल्वे स्थानकावर घडली. अपघातातील तिन्ही महिला नांदुरा येथील रहिवाशी आहेत.  आजूबाजूच्या परिसरातील महिला, पुरुष भाविक श्री. संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव येथे येतात. बहुतांश भाविक रेल्वे ने येतात. आज पुरुषोत्तम (अधिक) महिन्यातील एकादशी आहे. अधिक महिन्यातील रविवारी येणारी एकदशी पवित्र मानण्यात येते. त्यामुळे प्रामुख्याने रविवारी गर्दी राहते. दर्शनासाठी आलेल्या चार महिला अशाच रेल्वेस्थानकावर थांबल्या होत्या. भुसावळ पॅसेंजर मध्ये चढन्याच्या प्रयत्नात त्यांना चेन्नई एक्सप्रेस दिसला नाही. सरिता विजय साबे (वय ३०) रा. स्टेट बँकांच्या मागे नांदुरा, संगीता भानुदास गोळे (वय ४०) रा. अलमपूर ता नांदुरा, चंदाबाई शिवहरी तितरे (वय ४५) रा. अलमपूर ता. नांदुरा यांच्यासह एक महिला गाडी खाली आल्या, या अपघातात उपरोक्त तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांच्यावर शेगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्याकडे शेगाव नांदुरा असे भुसावळ पॅसेंजर चे तिकिट पोलिसांना सापडले.

Web Title: Three women died at shegaon railway station Chennai-Jodhpur express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.