जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:42 AM2017-11-21T00:42:32+5:302017-11-21T00:55:59+5:30

खामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार  आहे.

Temporary suspension of executive engineers in Jigga Tender scam case | जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

जिगाव निविदा घोटाळा प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना तात्पुरता जामीन 

Next
ठळक मुद्देमुंदडा यांच्या जामीनावर सोमवारी होणार सुनावणीमुंदडा यांच्या अर्जावर २७ ला सुनावणी!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव :  जिगाव प्रकल्पाच्या निविदा घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या  कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना सोमवारी न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर  केला. तर याच प्रकरणातील दुसरे आरोपी असलेल्या आर.जी. मुंदडा यांच्या जामीन  अर्जावर २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार  आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या  निविदेसाठी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत यवतमाळ येथील  बाजोरिया कन्स्ट्रकशन कंपनीला बनावट प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आल्यानंतर  मजीप्रा चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता संजय वाघ, जलसंपदा विभाग अमरावती  विभागाचे तत्कालीन मुख्य अभियंता एम. व्ही. पाटील,  पूर्व अर्हता पात्रता तपासणी  समितीतील सो. रा. सूर्यवंशी, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता  शरद गावंडे, भा.शा.वावरे, मध्यवर्ती सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता  भीमाशंकर अवधूत पुरी, नाशिक, मन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता आर.जी.  मुंदडा यांच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, याप्रकरणी मजीप्रा  चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाघ यांनी ७ नोव्हेंबर रोजी जिल्हा व  सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर १५  नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली असता, २0 नोव्हेंबर ही पुढील तारीख देण्यात आली  होती. सोमवारी कार्यकारी अभियंता संजय वाघ यांना खामगाव जिल्हा व सत्र  न्यायालयाने तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, यासंदर्भातील पुढील  सुनावणी २ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

मुंदडा यांच्या अर्जावर २७ ला सुनावणी!
खामगाव येथील मन प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंता आर.जी.मुंदडा यांनी  ६ नोव्हेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला हो ता; मात्र न्यायालयाने मुंदडा यांच्या अर्जावर १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी ठेवली.  त्यानंतर पुढील सुनावणी २0 नोव्हेंबर रोजी ठेवण्यात आली; मात्र सोमवारी मुंदडा  यांच्या जामीन अर्जावर कोणताही निर्णय झाला नसून, त्यांच्या जामीन अर्जावर आ ता २७ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Temporary suspension of executive engineers in Jigga Tender scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.