किडणी आजाराचे पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी पाणी योजनेचा कर शासनाने भरावा - सुबोध सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:32 PM2018-02-04T21:32:45+5:302018-02-04T21:33:07+5:30

पातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे किडनीग्रस्तांना शासकिय मदत द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली. 

Taxation of Wari Water Scheme to be completed by the government till the eradication of Kidney disease completely - Subodh Savji | किडणी आजाराचे पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी पाणी योजनेचा कर शासनाने भरावा - सुबोध सावजी

किडणी आजाराचे पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी पाणी योजनेचा कर शासनाने भरावा - सुबोध सावजी

Next
ठळक मुद्दे१४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढून किडनीग्रस्तांना शासकिय मदत देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
पातुर्डा : खारपाणपट्यातील किडणी आजार पूर्णत: निर्मूलन होईपर्यंत वारी वरुन होणा-या पाणी पुरवठा योजनेचा पाणीकर शासनाने भरावा असा इशारा माजीराज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिला आहे. १४० गाव पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार काढून मुंबई अपघातग्रस्तांप्रमाणे किडनीग्रस्तांना शासकिय मदत द्यावी अशी मागणी ही त्यांनी केली. 
२१ ते २७ जानेवारी दरम्यान बुलडाणा शासकीय पाणीपुरवठा योजना भ्रष्टाचार निर्मूलन समितीने ६६ गावातील समस्या जाणून घेतल्या. या दौ-याचा समारोप २८ जानेवारी रोजी पातुर्डा येथे बक्षीपुरा नगिना मजीद समोर कार्यक्रम संपन्न झाला. पाणीपुरवठा योजनातील भ्रष्टाचार काढून पाणीकर शासनाने भरावा अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली.
यावेळी विष्णू पाटील, मोहन जाधव, प्रसेनजित पाटील, वा.रा. पिसे, अविनाश आकोटकार मंचावर उपस्थित होते. यावेळी विष्णू पाटील, मोहन जाधव, प्रसेनजित पाटील यांनी विचार मांडले. यावेळी सुबोध सावजी म्हणाले की, ९२ गावात वारीचे पाणी पोहचवणाºया अधिका-यांचा दावा सपशेल खोटा आहे. केवळ २ गावात पाणी पोहचले. पाण्याच्या दाबामुळे पाईप फुटत आहेत. लोकांना शुध्द पाणी मिळत नाही. जळगाव, संग्रामपूर तालुक्यातील जनता उपेक्षितांचे जिणे जगत आहे. मुंबई पुल दुर्घटनेत मरणा-यांना ५ त ७ लाख रुपये मिळतात याच राज्यात किडनी ग्रस्तांना वा-यावर सोडले जाते. किडनीग्रस्तांना उपचारासाठी मदत द्यावी. माझे आंदोलन सुरुच राहणार असून ६ फेब्रुवारीपर्यंत जळगाव तालुक्यात दौरा करणार असल्याचे सावजी यांनी सांगितले. यावेळी पांडुरंग वाघमारे, उकर्डा राऊत, मीर कुर्बान अली, प्रकाश देशमुख, शेख जफरोद्दिन, गोपाल उमाळे, संजय वानखडे, मिरानोद्दिन काझी, मोहन सोनोने, इरफार शहा, शत्रुघ्न अवचार, हसन ठेकेदार, डॉ.झाडोकार, मौलवी अन्सार, मौलवी अब्दुल्ला, पवन देशमुख, आबेदखा मौलाना, अमजतखा ठेकेदार, सिध्दार्थ गाढे, रहेमान कुरेशी, शालीग्राम ढोकणे, गुलाब सुभेदार, इब्राहीम कुरेशी, संतोष तायडे, दिनकर इंगळे, राकीब काझी, प्रभाकर वानखडे, शमा पटेल, हरुनखा, राजू इंगळे आदी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. आभार डॉ.अविनाश झाडोकार यांनी मानले. 

Web Title: Taxation of Wari Water Scheme to be completed by the government till the eradication of Kidney disease completely - Subodh Savji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.