जाज्वल्य देशभक्तीचा वारसा जोपासणारे तानाजी गणेशोत्सव मंडळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:33 PM2018-09-18T12:33:25+5:302018-09-18T12:34:37+5:30

Tanaji Ganeshotsav Mandal that inherits patriotism! | जाज्वल्य देशभक्तीचा वारसा जोपासणारे तानाजी गणेशोत्सव मंडळ!

जाज्वल्य देशभक्तीचा वारसा जोपासणारे तानाजी गणेशोत्सव मंडळ!

googlenewsNext

- अनिल गवई। 

खामगाव :  शहरातील  शिवाजी नगर भागातील तानाजी गणेशोत्सव मंडळाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झाली.  लोकमान्य टिळकांच्या प्रखर आणि क्रांतीकारी विचाराने प्रेरीत होऊन या भागातील युवकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. तानाजी व्यायाम शाळेची स्थापना सन १९३३ मध्ये करण्यात आली असून, या मंडळाच्या गणेशाला शहरात मानाचे स्थान आहे.

जाज्वल्य देशभक्तीचा ऐतिहासिक वारसा जोपासणाºया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्रता आंदोलनासोबतच गोवामुक्ती आंदोलनात कारावास भोगल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या दप्तरी असलेल्या हस्तलिखितात आहे. सामाजिक क्षेत्रात तानाजी मंडळ अग्रेसर असून, तानाजी व्यायाम शाळेने राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरावर अनेक खेळाडू घडविलेत. मैदानी खेळात पारंगत युवकांची फौज ही तानाजी गणेशोत्सव मंडळाची जमेची बाजू आहे. नैसर्गिक आपत्ती, रक्तदान, रक्ततपासणी, आरोग्य तपासणी शिबिर, पल्स पोलिस मोहिमेसोबतच इतरही समाजपयोगी उपक्रमांमध्ये तानाजी मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सदैव पुढाकार असतो. नरवीर तानाजी मालसुरे यांचा महाराष्ट्रातील एकमेव पुर्णाकृती पुतळा मंडळाने उभारला आहे. सोबतच सन २००७ मध्ये तानाजी व्यायाम शाळेने अमृतमहोत्सव साजरा केला. त्यानंतरमंडळाचे तत्कालीन अध्यक्ष स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्यासंकल्पनेतून   १४ फूट उंचीचा आणि साडेचार टन वजनाचा भव्य अश्वारूढ पुतळाही उभारला आहे. 


नैसर्गिक आपत्तीत धावून जाणारे मंडळ!

आंध्रप्रदेश, बिहार राज्यातील पूरासोबतच सन १९९५ साली लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील प्रलयकारी भूकंपाच्यावेळी तानाजी मंडळाच्या  कार्यकर्त्यांनी आपत्तीग्रस्तांना मदत केली. त्यासोबतच बुलडाणासह अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीत मंडळाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांनी सदैव मदतीचा हात पुढे केला.

स्व. भाऊसाहेब फुंडकरांचे मंडळ म्हणून ओळख!

विद्यार्थी दशेमध्ये खेळाडू राहीलेले स्व. भाऊसाहेब फुंडकर सन. १९९१ साली तानाजी व्यायाम मंडळाचे अध्यक्ष बनलेत. तेव्हापासून हे मंडळ खºयाअर्थाने नावारूपाला आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकरांचे गणेशोत्सव मंडळ म्हणूनच तानाजी मंडळाची परिसरात ख्याती आहे. मंडळाचे सचिव म्हणून ओंकारआप्पा तोडकर असून यावर्षी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांची मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

विद्यादानाचे अविरत कार्य!

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील बालकांसाठी सन १९८५ पासून या मंडळाच्यावतीने नि:शुल्क बालक मंदिर चालविण्यात येत आहे. सोबतच  बालक मंदिरातील बालकांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचेही वितरण केल्या जाते. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना स्वयं रोजगारासाठी मदत म्हणून नि:शुल्क शिलाईमशीन प्रशिक्षण केंद्रही याठिकाणी चालविण्यात येते.

Web Title: Tanaji Ganeshotsav Mandal that inherits patriotism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.