तालुका कृषी अधिका-यांची आमदाराकडून कानउघडणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:35 AM2018-03-20T01:35:06+5:302018-03-20T01:35:06+5:30

शेगाव(जि.बुलडाणा): तालुक्यातील भोनगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत का टाकले नाही, यावरून आ. आकाश फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी ढाकणे यांची चांगलीच कानउघाडणी केली. ड्युटी करायची इच्छा नसेल तर काम सोडून द्या, असा दमही आमदारांनी त्यांना दिला. याशिवाय खामगाव तालुक्यातील १२५ बंधाºयांचा आराखडा सादर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. एकंदरीत शेतीचे प्रश्न, जलसिंचन, पिण्याचे पाणी आदीवरून १७ मार्च रोजी पार पडलेली आमसभा चांगलीच गाजली. 

Taluka Agriculture Officers Amid the MLA! | तालुका कृषी अधिका-यांची आमदाराकडून कानउघडणी!

तालुका कृषी अधिका-यांची आमदाराकडून कानउघडणी!

Next
ठळक मुद्देशेगाव पंचायत समिती आमसभेत पाणीटंचाई शेतीच्या प्रश्नावर गदारोळ

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव(जि.बुलडाणा): तालुक्यातील भोनगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तरीसुद्धा हे गाव जलयुक्त शिवार योजनेत का टाकले नाही, यावरून आ. आकाश फुंडकर यांनी तालुका कृषी अधिकारी ढाकणे यांची चांगलीच कानउघाडणी केली. ड्युटी करायची इच्छा नसेल तर काम सोडून द्या, असा दमही आमदारांनी त्यांना दिला. याशिवाय खामगाव तालुक्यातील १२५ बंधाºयांचा आराखडा सादर न केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली. एकंदरीत शेतीचे प्रश्न, जलसिंचन, पिण्याचे पाणी आदीवरून १७ मार्च रोजी पार पडलेली आमसभा चांगलीच गाजली. 
पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार २०१७-१८ चा सरपंच मेळावा व वार्षिक आमसभा १७ मार्च रोजी घेण्यात आली. याप्रसंगी सध्याची पाणीटंचाई ही निसर्गनिर्मित असून, त्याला सर्व मिळून एकत्रितपणे सामोरे जाऊ, असे आवाहन आ.अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी सरपंचांना केले. शेगाव तालुक्यातील सर्व जि.प. सदस्य, पं.स. सदस्य व सभापती विठ्ठल पाटील, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार गणेश पवार यांची मंचकावर उपस्थिती होती. तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती होती. त्याचप्रमाणे प.सं.चे सर्व विभागाचे अधिकारी, महावितरण, तालुका कृषी विभाग इत्यादी विभागाचे अधिकारी या सभेला उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर बीडीओ श्रीकृष्ण सावळे यांनी पं.स. अंतर्गत सर्व विभागांचा अहवाल सादर केला. त्यानंतर आमसभेला उपस्थित सरपंचांनी आपल्या गावातील समस्या सभेत मांडल्या. आ. फुंडकर यांनी अधिकाºयांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या सभेत पाणीटंचाईबाबत जास्त समस्या मांडण्यात आल्या. चिंचोली, मनसगाव, कुरखेड, भोनगाव, पाडसूळ, सवर्णा, माटरगांव, निंबी इत्यादी गावातील विविध समस्या याठिकाणी मांडण्यात आल्या. संबंधित अधिकाºयांनी त्यावर उपाययोजना सुचवल्या. ग्रामीण परिसरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकुल करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून १६ मार्च २०१८ रोजी महसूल विभागाला प्राप्त झाले असून, शासन परिपत्रकाचे वाचन सर्व सरपंचांनी आपल्या गावातील ग्रामसभेत करावे, अशी सूचना उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी आमसभेत दिली.
पाणीटंचाईच्या उपाययोजना तातडीने राबवा
जर कोणीही पाणीटंचाईच्या कामात दिरंगाई करेल तर त्यांना शासन होईल, हे लक्षात ठेवावे. अशावेळी जनतेसाठी काहीही करू असे ते म्हणाले. पक्षभेद बाजूला ठेवून पाणीटंचाईचा सामना करावा असे आवाहन त्यांनी सभेला उपस्थित विरोधी पक्षाच्या सरपंचांना केले. तालुक्यातील आरओ प्लांट बंद पडले आहेत. 
त्यासाठी ग्रामपंचायतीने विद्युत बिल व आरओचे मेंटनन्स करण्याची जबाबदारी पार पाडावी, अशी सूचनाही त्यांनी केली. 
मनसगाव येथे पाण्याचे स्रोतच नसल्यामुळे दुसरी काही उपाययोजना करावी, अशी सूचना आ. आकाश फुंडकर यांनी केली. 
 
ग्रा.पं. सदस्य साजिद यांच्यासोबत शाब्दिक चकमक
मनसगाव येथील आरओ प्लान्ट बंद असल्याच्या कारणावरून आ. फुंडकर व ग्रा.पं.सदस्य सै. साजिद यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी लोकप्रतिनिधी कामे करीत नसल्याचा आरोप लावणाºया साजिद यांना त्यांच्या गावातील आरओ मशीन कोणत्या कंपनीने बसविली, हे वेळेवर सांगता आले नाही. त्यावरून आ. फुंडकर यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली. त्यानंतर आपल्या भाषणातून आ. फुंडकर यांनी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. 

आ. कुटेंची अनुपस्थिती
या सभेला आ.डॉ. संजय कुटे हे अनुपस्थित होते. त्यामुळे कुटे यांच्या मतदारसंघातील  विरोधी पक्षाच्या सरपंचांनी आ. कुटे यांच्या विरोधात बोलून चांगलेच तोंडसुख घेतले. सभेला आ. कुटे हजर राहत नाहीत आणि त्यामुळे आमच्या गावांचा विकास होत नाही, असा आरोप यावेळी काही सरपंचांनी केला. आ. कुटे जरी आले नसले तरी त्यांच्या गावांची कामे होणार नाहीत, असे होणार नसल्याचे सांगून आ. फुंडकर यांनी कुटे हे काही कामामुळे येऊ शकले नाहीत, असे सांगून वेळ मारून नेली. 
 

Web Title: Taluka Agriculture Officers Amid the MLA!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.