सर्व घटकांना सोबत घेऊन बाजार समितीचा विकास साधावा - राहुल बोंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:20 AM2018-02-25T00:20:51+5:302018-02-25T00:20:51+5:30

चिखली : शेतकर्‍यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधावा, अशी अपेक्षा आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली.

Take the development of market committee along with all the factors - Rahul Bondre | सर्व घटकांना सोबत घेऊन बाजार समितीचा विकास साधावा - राहुल बोंद्रे

सर्व घटकांना सोबत घेऊन बाजार समितीचा विकास साधावा - राहुल बोंद्रे

googlenewsNext
ठळक मुद्देनवनिर्वाचित सभापती सचिन शिंगणे यांनी स्वीकारला पदभार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शेतकर्‍यांची हक्काची बाजारपेठ असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीने सातत्याने शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. या बाजार समितीला सचिन शिंगणे यांच्या रूपाने तरुण तडफदार नेतृत्व लाभले असून, नवनिर्वाचित सभापतींनी बाजार समितीच्या सर्व घटकांना सोबत घेऊन विकास साधावा, अशी अपेक्षा आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केली.
कृषी उत्पन्न बाजार समिती चिखलीच्या सभापतीपदी सचिन शिंगणे यांची निवड झाल्यानंतर २४ फेब्रुवारी रोजी बाजार समितीच्या शेतकरी निवासामध्ये आयोजित पदग्रहण सोहळय़ाच्या अध्यक्षस्थानावरून आ. बोंद्रे बोलत होते. त्यावेळी पांडुरंग खेडेकर, विनायक पडघान यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळय़ात नवनिर्वाचित सभापती सचिन शिंगणे यांनी पदभार स्वीकारला. त्यावेळी पुढे बोलताना आ.बोंद्रे यांनी सहकार व राजकीय विषयावर भाष्य करून शिंगणो परिवाराचे सहकार क्षेत्रातील योगदान उंच पातळीवरचे असल्याचे स्पष्ट करून सचिन शिंगणे यांना सभापती पदावर काम करण्याची संधी उशिराने मिळाली असली, तरी त्यांच्या रूपाने तरुण व तडफदार नेतृत्व समितीला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले, तर सचिन शिंगणे यांनी सभापती पदाला योग्य न्याय देत बाजार समितीतील सर्व घटकांना सोबत घेऊन शेतकरी हित व बाजार समितीच्या विकासाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. प्रास्ताविक माजी सभापती विष्णू कुळसुंदर यांनी केले. प्रसंगी डॉ.सत्येंद्र भुसारी, संजय पांढरे, आर.बी. वानखडे, संचालक संजय गाडेकर, विनायक पडघान यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन सुधीर पडघान व अँड.विलास नन्हाई तर आभार समितीचे सचिव अजय मिरकड यांनी मानले. त्यावेळी उपसभापती ज्ञानेश्‍वर सुरूशे, संचालक अशोक मगर, पुष्पा भुतेकर, ईश्‍वर इंगळे, रूपराव सावळे, पुष्पा पडघान, सुमन म्हस्के, विजय शेजोळ, राजीव जावळे, मनोज खेडेकर, गजानन पवार, दीपक हाके, प्रकाश निकाळजे, लक्ष्मण अंभोरे, अशोक पडघान, अँड.विश्‍वास बाहेकर, शिवनारायण म्हस्के, राम जाधव, प्रताप कुटे, शेषराव पाटील, मदन म्हस्के, रमेश सुरडकर, देवीदास कणखर, गजानन वायाळ,  अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, दीपक खरात, अ.रऊफ, सचिन बोंद्रे, विलास चव्हाण, शैलेश अय्या, बाळू महाजन, गजानन तारू, तुषार भावसार, राहुल सवडतकर, गौरव बाविस्कर, रवी तोडकर, शेखर बोंद्रे, भगवान काळे, संतोष लोखंडे, प्रशांत एकडे, प्रकाश शिंगणे, बाळासाहेब पवार, डॉ.विकास मिसाळ, गणेश कोरके, कृष्णा मिसाळ, प्रमोद चिंचोले, सुनील पडघान, सुरेश बलकार, विनोद सुरडकर, सर्जेराव पडघान, समाधान पाटील आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.         

Web Title: Take the development of market committee along with all the factors - Rahul Bondre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.