संग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:47 AM2018-10-20T09:47:07+5:302018-10-20T11:16:10+5:30

पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले.

Swabhimani Shetkari Sanghatana agitation in sangrampur | संग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

संग्रामपुरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन 

संग्रामपूर - पश्चिम महाराष्ट्रातील दुध व ऊस आंदोलनाच्या धर्तीवर व विदर्भ, मराठवाडयातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथे शनिवारी (20 ऑक्टोबर) सकाळी 8.30 वाजता रास्तारोको करण्यात आला. 

आता शांत बसायचे नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून सोयाबीन कापसाची नुकसान भरपाई घेऊ असे आवाहन करीत 20 ऑक्टोबर रोजी चक्काजाम आंदोलनात ताकदीने रस्त्यावर उतरा असे आवाहन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना केले होते. त्या अनुषंगाने आज वरवट बकाल येथे बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. 

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी संघटीत होऊन दुध व ऊसाला भाव मिळवून घेतला. मात्र विदर्भातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसाला भाव मिळत नाही. कारण इथला शेतकरी संघटीत नाही. दुसरीकडे भाजपचे सरकार हे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारला नुकसान भरपाई व जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा, सोयाबीन कापसाला हमीभाव जाहीर करावा शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रूपये नुकसान भरपाई दया या बरोबरच तुर, उडीद व हरभऱ्याचे चुकारे तातडीने दया, ऑनलाईनच्या गोंधळामुळे मागील वर्षी जे शेतकरी पिकविमा भरु शकले नाही त्यांना 50 टक्के मिकविम्याची रक्क्म दया अशा विविध मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आजचे चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

शेतकरी विरोधी असलेल्या या भाजपा सरकारचे कमळ 2019 ला औषधालाही ठेवू नका असे आवाहनही रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. आंदोलनात शेतकऱ्यांनी बैलजोडी, सोयाबीन, कापूस रस्त्यावर टाकून निषेध केला तसेच टायर जाळण्यात आले. यावेळी युवकांनी वाहन अडवण्यात आले. या आंदोलनात युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर,युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष राहूल मारोडे तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, जळगाव जा. तालुका अध्यक्ष नितीन पाचपोर, योगेश मुरूख, रोषण देशमुख,सागर खानझोडे, रामेश्वर घाटे, गणेश वहितकर, गजानन आमझरे, विलास तराळे, राजू उमाळे, भगवान तायडे, मोहन पाटील यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Swabhimani Shetkari Sanghatana agitation in sangrampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.