स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खड्डय़ात बसून ठिय्या आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 01:10 AM2017-11-24T01:10:17+5:302017-11-24T01:13:21+5:30

धामणगाव बढे: येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस् तीसाठी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा  बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे  बुजविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही.

Swabhimani Shetkari organization sit in the pavement and protest movement! | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खड्डय़ात बसून ठिय्या आंदोलन!

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खड्डय़ात बसून ठिय्या आंदोलन!

Next
ठळक मुद्देधामणगाव बढे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे: येथील रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. रस्ता दुरुस् तीसाठी बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केलेल्या आहेत. तरीसुद्धा  बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे  बुजविण्यासाठी कोणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे धामगणाव बढे येथील  नागरिकांच्या या प्रश्नावर २२ नोव्हेंबरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ  प्रमुख राणा चंदन तसेच अल्पसंख्याक       आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख  रफिक शेख करीम यांच्या नेतृत्वात      रस्त्याच्या खड्डय़ात बसून ठिय्या  आंदोलन केले.
बांधकाम विभागाने या परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करून होणारे अपघात  टाळावे, जेणेकरून या रस्त्यावर अपघात होणार नाही. याची काळजी घ्यावी  म्हणून बांधकाम विभागाने धामणगाव बढे येथील रस्ता दुरुस्ती करून खड्डेमुक्त  रस्ता केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्याच्या खड्डय़ामध्ये  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याला बसविल्याशिवाय राहणार  नाही. 
या आंदोलनामध्ये महेंद्र जाधव, प्रदीप शेळके, सैय्यद वसीम, गंगाधर तायडे,  ज्ञानदेव हरमकर, विजय बोराडे, कलीम कुरेशी, रशीद पटेल, नारायण  किन्होळकर, शेख साजिद, कडुबा मोरे, हरिभाऊ उबरहाडे, अमोल मोरे,  फकिरा निकाळजे, अतिम खासाब, सतीश नवले, सादिक खान, रमेश जोशी,  संदीप नवले, मयूर सोनुने, अनंथा बावस्कर, राहुल रायपुरे, गोपाल शिप्पलकर,  मुकुंदा पायके, सादिक पटेल, जुबेर पटेल, मोहन शिंदे यासह असंख्य कार्यक र्त्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Swabhimani Shetkari organization sit in the pavement and protest movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.