खामगावातील ८९३ घरकुलांचा ‘डीपीआर’ सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:24 PM2018-10-12T16:24:51+5:302018-10-12T16:25:32+5:30

submitting the 'DPR' of 893 houses in Khamgaon | खामगावातील ८९३ घरकुलांचा ‘डीपीआर’ सादर

खामगावातील ८९३ घरकुलांचा ‘डीपीआर’ सादर

Next

- अनिल गवई 

लोकमत न्यूज नेटवर्क 

खामगाव :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नांतील भारत घडविण्यासाठी ‘२०२२ पर्यंत सर्वांना घरे’ हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने खामगाव शहरातील ८९३ घरकुलांचा प्रस्तावित प्रकल्प अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करण्यात आला आहे.

पंतप्रधान आवास योजनेतंर्गत खामगाव नगर परिषद हद्दीतील विविध वस्तींमध्ये नियोजीत घरकुल उभारणीसाठी  खामगाव नगर पालिकेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्याअनुषंगाने शहरातील ८९३ घरकुलांचे पाच टप्प्यांमध्ये २२३२.५० लक्ष रुपये अनुदानाचे प्रकल्प अहवाल तयार करण्यात आले. या पाचही प्रकल्प अहवाल (डीपीआर) प्रस्तावास मान्यता प्रदान करण्यासाठी, म्हाडाकडे शिफारस करण्यासाठी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे खामगाव नगर पालिकेने सादर केला आहे. यामध्ये सर्वाधिक लाभार्थी संख्या ही गोपाळ नगरातील ०२४९ इतकी आहे.


घरकुलासाठी केंद्राकडून अनुदान!

२५ जून रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत ही योजना जाहीर करण्यात आली. देशातील चार हजार ४१ शहरांमध्ये ही योजना राबविण्यात येत असून,   अत्यल्प आणि अल्प गटांसाठी असलेल्या या योजनेकरिता पात्र होण्यासाठी लाभार्थीचे, स्वत:च्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे, देशभरात कुठेही पक्के घर असता कामा नये, अशी अट घालण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून अत्यल्प आणि अल्प गटाच्या घरासाठी प्रत्येकी दीड लाख रुपयांचे अनुदान केंद्राकडून मिळणार आहे. 
 

Web Title: submitting the 'DPR' of 893 houses in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.