विषय समिती निवडणूक: खामगाव पालिकेत पाच जणांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:37 PM2019-01-05T12:37:12+5:302019-01-05T12:37:34+5:30

खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या विषय समिती निवडणुकीत नगरसेवक राकेशकुमार राठोड यांच्यासह चार महिलांनी सभापतीपदासाठी दुपारी १२:३० वाजता नामांकन दाखल केले.

Subject Committee Election: 5 nominations filed in Khamgaon Municipality | विषय समिती निवडणूक: खामगाव पालिकेत पाच जणांचे नामांकन दाखल

विषय समिती निवडणूक: खामगाव पालिकेत पाच जणांचे नामांकन दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव : स्थानिक नगर पालिकेच्या विषय समिती निवडणुकीत नगरसेवक राकेशकुमार राठोड यांच्यासह चार महिलांनी सभापतीपदासाठी दुपारी १२:३० वाजता नामांकन दाखल केले. संख्याबळाच्या आधारे उपरोक्त पाचही जणांची निवड निश्चित मानल्या जात असून, खामगाव पालिकेत महिलांचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे दिसते.  निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याचे दिसून येते. 

खामगाव नगर पालिकेतील बांधकाम सभापतीपदा करीता नगरसेवक राकेशकुमार राठोड उर्फ राकेश राणा, पाणी पुरवठा सभापतीपदासाठी लताताई मुकींदा गरड, आरोग्य सभापती दुर्गाताई हट्टेल, शिक्षण : शिवाणी कुळकर्णी यांनी तर महिला आणि बालकल्याण सभापतीपदासाठी सरलाताई कावणे यांनी आपले नामांकन दुपारी १२: ३० वाजता अर्ज दाखल केले. संख्याबळाच्या आधारे उपरोक्त पाचही जणांची नियुक्ती निश्चित मानली जात असून, या निवडणुकीची केवळ औपचारिकताच शिल्लक असल्याचे दिसून येते. गेल्या निविडणुकीत विरोधीगटातून नामांकन अर्ज सादर करण्यातच आले नव्हते. त्यामुळे उपरोक्त पाचही जणांची निवड निश्चित मानली जात आहे. नियोजन समितीचे पदसिध्द अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष संजय पुरवार यांच्या नावावरही यावेळी पुन्हा शिक्कामोर्तब झाले. तत्पूर्वी पालिका सभागृहात विषय समिती सदस्य आणि स्थायी समिती सदस्यांसाठी नामांकन अर्ज सादर करण्यासाठी सकाळी ११ वाजता विशेष बैठक पार पडली. या बैठकीला पीठासीन अधिकारी म्हणून प्रभारी तहसीलदार योगेश देशमुख, सहा. पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, प्रशासन अधिकारी एल.जी. राठोड, सुधीर राऊत, जीवन बटवे यांनी कामकाज पाहीले.

Web Title: Subject Committee Election: 5 nominations filed in Khamgaon Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.