धावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 08:33 PM2018-11-15T20:33:13+5:302018-11-15T20:36:45+5:30

शॉर्ट सर्किटमुळे धावत्या एसटीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून धावती बस रस्त्याच्या कडेला उभी केली.

the stomach was stopped by the stomach, the driver and the driver's efforts failed | धावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

धावत्या एसटीने घेतला अचानक पेट, चालक-वाहकाच्या शर्थीच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ

Next

खामगाव :  शॉर्ट सर्किटमुळे धावत्या एसटीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखून धावती बस रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहकाच्या मदतीने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. बसमधील सर्वच ३८ प्रवाशांची सुखरूप सुटका झाली. चित्रपटाच्या कथानकाला साजेसा हा प्रकार गुरुवारी रात्री ८.४५ वाजता अकोला-खामगाव मार्गावरील बाळापूर फैलानजीक घडली.

औरंगाबाद आगाराची एमएच २० बीएल ३८०४ ही एशियाड बस अकोला येथून औरंगाबादकरिता निघाली. खामगावपासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील एका पेट्रोलपंपासमोर या बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे बसमधील प्रवाशांची घाबरगुंडी उडाली. दरम्यान, चालकाने वेळीच बस रस्त्याच्या कडेला उभी केली. वाहकाच्या मदतीने या प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर बसमधील ड्राय केमिकल पावडर बंबाच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दरम्यान, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घाबरगुंडी उडाली होती. काही प्रवासी धावत लोकवस्तीकडे निघाले होते. शार्ट सर्कीटमुळे बसने पेट घेतला. ही आग विझविण्यात येऊन प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.

Web Title: the stomach was stopped by the stomach, the driver and the driver's efforts failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.