खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:41 AM2018-01-05T01:41:09+5:302018-01-05T01:42:08+5:30

बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा  महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंबित आहे.

Start the work of Khamgaon-Jalna rail line immediately! | खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा!

खामगाव-जालना रेल्वेमार्गाचे काम तत्काळ सुरू करा!

Next
ठळक मुद्देप्रतापराव जाधव यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : खामगाव-जालना प्रलंबित रेल्वेमार्गाचे काम त्वरेने सुरू करण्यात यावे, अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा  महत्त्वपूर्ण रस्ता जवळपास १00 वर्षांपासून प्रलंबित आहे.
दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची ४ जानेवारीला त्यांनी भेट घेऊन ही मागणी रेटत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी डीआरयूसीसीचे सदस्य दिनेश शिंदे, उमेश पाटील, उमेश कलोरे, अँड. समीर मोरे यांच्यासह अन्य उपस्थित होते. जवळपास १00 वर्षांपासून या रेल्वे मार्गाची प्रतीक्षा आहे. २0१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने तीन हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती; मात्र अद्याप कुठलेही काम किंवा तत्सम स्वरूपाची प्रगती या मार्गावर झालेली नाही. २00९-१0 मध्ये खामगाव-जालना या १५५ किमीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरात देण्यात आली होती. २0१२ मध्ये त्याचा अहवाल सादर झाला होता. विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा हा मार्ग बुलडाणा जिल्ह्यातून १३0 किमी लांबीचा आहे.  मध्य आणि दक्षिण रेल्वेलादेखील याद्वारे जोडल्या जाऊ शकते. आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यात रोजगाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण भूमिका हा मार्ग निभवेल, असे ही खा. प्रतापराव जाधव म्हणाले. सोबतच राज्य सरकारच्या हिस्यातील ५0 टक्के राशी यासाठी समायोजित केली जावी, त्यासाठी शासकीय जमीन विनाशुल्क आणि लागणार्‍या गौण खनिजाची रॉयल्टी राज्य सरकारला न देता ही राशी समायोजित केली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी पब्लीक प्रायव्हेट पाटर्नरशिपसुद्धा निश्‍चित केली जावी, अशी मागणी त्यांनी केली. 

Web Title: Start the work of Khamgaon-Jalna rail line immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.