एसटी बस पुलावरून घसरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:54 AM2017-11-23T00:54:16+5:302017-11-23T00:56:41+5:30

लोणार येथून  वढवकडे ६ वाजून ३0 मिनिटांनी जाणारी बस क्रमांक एमएच  ४0, ८४५0 चे चालक बी.एस. जायभाये यांचे नियंत्रण सुटल्याने बस बसवेश्‍वर चौका तील पुलावरून खाली घसरली; मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. 

ST bus pulls down from the bridge! | एसटी बस पुलावरून घसरली!

एसटी बस पुलावरून घसरली!

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने जीवित हानी टळलीबसमध्ये २५ प्रवासी होतेनियंत्रण सुटल्याने बसवेश्‍वर चौका तील पुलावरून खाली घसरली बस

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार :  लोणार येथून  वढवकडे ६ वाजून ३0 मिनिटांनी जाणारी बस क्रमांक एमएच  ४0, ८४५0 चे चालक बी.एस. जायभाये यांचे नियंत्रण सुटल्याने बस बसवेश्‍वर चौका तील पुलावरून खाली घसरली; मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. 
सदर बसमध्ये  गायखेड, पळसखेड, हिरडव, आरडव, वढव येथील अंदाजे २५ प्रवासी  होते. बस अचानक खाली घसरल्याने प्रवासी घाबरून गेल्यामुळे एकच तारांबळ उडाली.  सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. बसवेश्‍वर चौकातील पुलावर कठडे नसल्याने  आणि पूल अरुंद असल्याने या ठिकाणी नेहमीच वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घड त असतात.

Web Title: ST bus pulls down from the bridge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.