सोयाबीनच्या उत्पन्नात मजुरीही निघेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 12:11 AM2017-11-08T00:11:52+5:302017-11-08T00:12:37+5:30

संग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे.

Soybean earnings also result in wages | सोयाबीनच्या उत्पन्नात मजुरीही निघेना

सोयाबीनच्या उत्पन्नात मजुरीही निघेना

Next
ठळक मुद्देसोयाबीन पिकासाठी खर्च ५ हजार एका एकरातून उत्पादन १  हजार ५00 रूपये 

अमोल ठाकरे। 
लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर: शेतकर्‍यांसाठी नगदी पीक म्हणून सोयाबीन पीक  ओळखले जाते; मात्र यावर्षी सोयाबीन पिकाला पावसाचे वेळेवर  पाणी न मिळाल्यामुळे सोयाबीनला शेंगाच न लागल्यामुळे शे तकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर पिकाची सोंगणी केली. त्या  शेतकर्‍यांना प्रति एकरात फक्त १ क्विंटलच सोयाबीनचे उत्पादन  झाले आहे. तसेच या सोयाबीन पिकाला बाजारात कवडीमोल  भाव मिळत असल्यामुळे या सोयाबीन उत्पादनातून काढणीचा  खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी चांगला पाऊस होईल,  असे समजले होते. त्यामुळे शेतकर्‍यांनी गतवर्षीच्या तुलनेत  यावर्षी संग्रामपूर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाची  पेरणी मोठय़ा प्रमाणात केली होती. सन २0१७-१८ च्या खरीप  हंगामात शेतकर्‍यांनी १४ हजार ८५९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची  पेरणी केली. सुरुवातीला पावसाने ही साथ दिली; मात्र ऐन  दिवाळीच्या आधी ज्यावेळी सोयाबीन पिकाला पावसाची  आवश्यकता असते, ऐन त्याचवेळी ऑक्टोबर महिन्यात पावसाने  दांडी मारल्यामुळे सोयाबीन पिकाला फटका बसला वेळेवर  पाऊस न बरसल्यामुळे ज्या प्रमाणात सोयाबीनला शेंगा लागायला  पाहिजे  होत्या. त्या प्रमाणात शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे शेतात  सोयाबीन होते; मात्र सोयाबीनच्या झाडाला शेंगाच नसल्यामुळे  काही ठिकाणी शेतकर्‍यांनी चक्क सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर  फिरवला; मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची काढणी केली, त्या  शेतकर्‍यांना फक्त एकरी सोयाबीनच्या पिकातून १ क्विंटल प्रति िक्वंटल उत्पादन झाले व या सोयाबीनला बाजारात फक्त १ हजार  ५00 ते २ हजार २00 रुपयापर्यंतच भाव मिळाले. 
एका एकरात सोयाबीन उत्पन्न १ हजार ५00 रुपये तर पेरणी पासून बियाणे, रासायनिक खत, फवारणी, डवरणी व काढणी  याचा खर्च ५ हजार रुपये त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनातून  काढणी खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वा तावरण निर्माण झाले आहे. वर्षभराचा खर्च मुलाचे शिक्षण,  दवाखाने, लग्न व घराचा कारभार कसा सांभाळावा, असा यक्ष प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने सोयाबीन  उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी तालु क्यातील शेतकर्‍यांकडून जोर धरत आहे. 

पिकासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत लागणारा खर्च
सोयाबीन बियाणे         
१ बॅग प्रति एकर - १,५00 रुपये
रासायनिक खत - १000 रुपये
तणनाशक    - ८00 रुपये
फवारणी - ८00रुपये
डवरणी - ५00  रुपये 
काढणी खर्च - १,000 रु.
एकूण खर्च - ५,१00 रुपये

एकरी सोयाबीन पिकातून एक क्विंटल उत्पादनही होत  नसल्यामुळे व काढणीचा खर्चही निघत नसल्यामुळे शेतकर्‍यांना  सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवावा लागत आहे.
- राजेंद्र ठाकरे, शेतकरी, वडगाव वाण

Web Title: Soybean earnings also result in wages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती