३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 03:00 PM2019-07-07T15:00:57+5:302019-07-07T15:01:06+5:30

खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत.

Sowing remaining in 35 percent area | ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

३५ टक्के क्षेत्रावर पेरणी बाकी

Next

- देवेंद्र ठाकरे 
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : एकीकडे पाऊस नाही म्हणून पेरण्या रखडल्याचे गत तीन ते चार वर्षांपासून ऐकत आलो आहोत; परंतु यावर्षी पाऊस जास्त झाला म्हणून पेरण्या रखडल्या आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत ३५ टक्के क्षेत्रावर पेरण्या बाकी असल्याचे चित्र आहे.
यावर्षी जून अखेर खऱ्या अर्थाने दमदार पावसाचे आगमन झाले. तोपर्यंत शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा होती. अखेर पावसाचे आगमन झाले, तेही दमदार स्वरूपात. पहिल्याच पावसाने शहरातील नाल्यांची पुरती वाताहात झाली. शहरातील सखल भागात पाणी शिरले. खामगाव शहराप्रमाणेच तालुक्यातही दमदार पावसाला सुरूवात झाली. सुरू झालेला पाऊस जरा उघडीप देईल; त्यानंतर पेरण्यांना सुरूवात करू, असा शेतकºयांचा बेत होता, मात्र पाऊस थांबण्याचे नावच घेतांना दिसत नाही. प्रचंड पाऊस पडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. अशाही अवस्थेत शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली. परंतु शेतात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या. गत आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरूच असून पेरण्या उरकण्यासाठी शेतकरी पाऊस उघडण्याची प्रतिक्षा करीत आहेत. खामगाव तालुक्यात ६ जुलै पर्यंत ६५ टक्के पेरण्या झाल्या असल्या, तरी अद्याप ३५ टक्के पेरण्या बाकी असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान जिल्ह्यात अनेक शेतकरी पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहेत. परंतु दररोज पावसाच्या सरी कोसळत असल्याने शेती सुकत नसल्याचे दिसत आहे.

यावर्षी चांगला पाऊस झाला. सध्या शेतात पाणी साचले असल्याने पेरणी करता येत नाही. पावसाने उघडीप दिल्यानंतर पेरणी कण्यात येईल. पेरणी लांबली तरी हरकत नाही; परंतु चांगला पाऊस होणे आवश्यक आहे.
-नितिन पालीवाल
शेतकरी, घाटपुरी ता. खामगाव.


जिल्ह्यात अद्यापपर्यंत सुमारे ६५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पेरण्यांना वेग आला आहे. आणखी उघडीप दिल्यास येत्या ४ ते ५ दिवसांत उर्वरित पेरण्या पुर्ण होती.
-नरेंद्र नाईक
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

Web Title: Sowing remaining in 35 percent area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.