सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी पूर्ण; सोहळ्यात राहणार ४00 बुक स्टॉल!   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:28 AM2018-01-10T00:28:35+5:302018-01-10T00:29:05+5:30

सिंदखेडराजा :  जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  असे सर्व कक्ष मिळून  दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होतो. यावर्षी जिजाऊ सृष्टीवरील  जिजाऊ जन्मोत्सव २0१८ ची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी दिली आहे, तसेच यावर्षी सर्व बहुजन बांधवांची,  जिजाऊ भक्तांची वाढती संख्या पाहता निवास व्यवस्था, पाणी व्यवस्था करण्यात आली  आहे. 

Sindkhedraja: Preparations for Jijau Janmotsav are complete; 400 book stalls to be celebrated | सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी पूर्ण; सोहळ्यात राहणार ४00 बुक स्टॉल!   

सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाची तयारी पूर्ण; सोहळ्यात राहणार ४00 बुक स्टॉल!   

googlenewsNext
ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा :  जिजाऊ जन्मोत्सव मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  असे सर्व कक्ष मिळून  दरवर्षी १२ जानेवारीला साजरा होतो. यावर्षी जिजाऊ सृष्टीवरील  जिजाऊ जन्मोत्सव २0१८ ची तयारी पूर्ण झालेली आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी दिली आहे, तसेच यावर्षी सर्व बहुजन बांधवांची,  जिजाऊ भक्तांची वाढती संख्या पाहता निवास व्यवस्था, पाणी व्यवस्था करण्यात आली  आहे. 
यावर्षी जन्मोत्सव सोहळ्यात बुक स्टॉलची संख्या ४00 असून, हॉटेलची संख्या १00  करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून नव्हे, तर देशभरातून बुक स्टॉल व हॉटेल स्टॉल  जिजाऊ सृष्टीवर येत असतात. आतापर्यंत हॉटेलचे स्टॉल सर्व बुकींग झाले असून, बुक  स्टॉलसुद्धा मोठय़ा प्रमाणात बुक झालेले आहेत. यावर्षी पार्कींग व्यवस्था वाढविण्यात  आली आहे. जिजाऊ सृष्टीवर बुक स्टॉलची उलाढाल करोडो रुपयात होत असते. यावर्षी  प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती  संभाजीराजे भोसले, शिवo्री स्वप्नील खेडेकर आदी उपस्थित राहणार आहेत. यावर्षीचा  मराठा विधीभूषण पुरस्कार शिवo्री अँड.मिलिंद पवार, मराठा शिवशाहीर पुरस्कार शिवo्री  विजय तनपुरे, मराठा उद्योगभूषण पुरस्कार शिवo्री संजय वायाळ यांना देण्यात येणार  आहे, तसेच १0 जानेवारी रोजी मराठा समाजाकडून कुठल्याही प्रकारचा बंद राहणार  नाही, काही लोक अफवा पसरवत आहे, या अफवांना बळी पडू नये, असे आवाहन  करण्यात आले. 
१२ जानेवारीला सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होणार असून,  अध्यक्षीय भाषण शिवo्री पुरूषोत्तम खेडेकर यांचे होणार आहे. तरी सर्व बहुजन समाज  बांधवांनी १२ जानेवारीला सिंदखेडराजाला यावे, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष शिवाजी गव्हाड यांनी केले आहे. 

बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम
राजमाता जिजाऊ मासाहेब, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ सृष्टीवर ९  जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या  विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी जुन्या लोककला  विद्यार्थ्यांनी सादर केल्या. या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठा सेवा संघाचे  जिल्हा कार्याध्यक्ष  कैलासराव तायडे, पंकज देशमुख, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड  पदाधिकारी व कार्यकर्ते, विद्यार्थी, विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते. 
 

Web Title: Sindkhedraja: Preparations for Jijau Janmotsav are complete; 400 book stalls to be celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.