धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2018 05:00 PM2018-03-02T17:00:02+5:302018-03-02T17:00:02+5:30

धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार्च रोजी घडली.

Shocking Two sparrows killed by father on family dispute | धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या

धक्कादायक ! कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या

Next

बुलडाणा : धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सुलतानपूर येथे शुक्रवारी दोन मार्च रोजी घडली.
या घटनेत आकांक्षा विष्णू बडगे (वय चार),  सोहम विष्णू बडगे (वय दीड वर्षे) या दोन चिमुकल्या मुलांचा करून अंत झाला. दरम्यान, मेहकर पोलिसांनी या प्रकरणी मृत मुलांचे वडील विष्णू बडगे (वय २७) यास अटक केली. सुलतानपूर येथील विष्णू बडगे याचा पत्नी संगिता हीच्याशी शुक्रवारी दोन मार्च रोजी सकाळी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने त्याने  चार वर्षाची मुलगी आकांक्षा विष्णू बडगे आणि सोहम विष्णू बगडे (दीड वर्षे) यांना सोबत घेऊन सुलतानपूर कॅनाल रोडवर असलेल्या
शिवशंकर भानापुरे यांची विहीर गाठून त्यात आपल्या दोन्ही चिमुकल्यांना फेकून दिले. त्यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या नंतर लगोलग त्याने पुन्हा सुलतानपूर गाव गाठून आपण आपल्या दोन्ही मुलांना विहीरीत फेकून जीवे मारल्याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली, असे मेहकर पोलिसांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांनी लगोलग सुलतानपूरपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या कॅनॉल रोडवरील विहीरीवर धाव घेतली. मात्र तोवरून विहीरीच्या पाण्यात बुडून दोन्ही चिमुकले मृत झाले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी विहीरीतून दोन्ही मृत मुलांचे पार्थिव बाहेर काढले. उत्तरिय तपासणीसाठी त्यांचे पार्थिव मेहकर येतील रुग्णालयात हलविण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांचा ताफा लगोलगल मेहकर शहरापासून सुमारे २० ते २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर येथील कॅनॉल रोडवरील शिवार गाठले आणि ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृत मुलांना बाहेर काढले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. सोबतच या नराधम बापाला ग्रामस्थांच्या तोंडातून शिव्यांची वाखोली वाहल्या जात आहे.

विष्णू बडगेस अटक
घटनेचे गांभिर्य पाहता मेहकर पोलिसांनी लगोलग विष्णू काशीराम बडगे यास अटक केली आहे. मोलमजुरी प्रसंगी बांधकामावर काम करून किंवा दुकानावर काम करून विष्णू बडगे हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मात्र दोन मार्च रोजी कौटुंबिक वादातून त्याने दोनही पोटच्या गोळ््यांना विहीरीत फेकून जिवे मारले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये त्याचाविषायी तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या तो मेहकर पोलिसांच्या ताब्यात आहे.

- या घटनेत आकांक्षा विष्णू बडगे आणि सोहम विष्णू बडगे या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. आरोपी विष्णू बडगे यास ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप सांगता येणार नाही. त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे.
 - जी. एस. पाबळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, मेहकर पोलिस ठाणे

Web Title: Shocking Two sparrows killed by father on family dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.