‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 02:31 PM2019-07-23T14:31:06+5:302019-07-23T14:31:14+5:30

खामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले.

Shivneri Group; Distribution of school materials to 900 students | ‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

‘शिवनेरी ग्रुप’चा मदतीचा हात; ९०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ‘शिवनेरी ग्रुप’ने खामगाव तालुक्यातील विविध शाळांमध्ये जावून शालेय साहित्याचे वाटप केले.
या ग्रुपच्या अंतर्गत वर्षभर सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सह विविध क्षेत्रातील अनेक प्रकारांचे उपक्रम राबविण्यात येतात. तर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवनेरी ग्रुप खामगाव तर्फे ‘एक पाऊल स्वच्छ व शिक्षित भारताकडे’ या उपक्रमाची सुरुवात २४ जूनरोजी करण्यात आली. नागरिकांना आवाहन करण्यात आले की, त्यांनी आपल्या कडे जमा असलेले रद्दी शिवनेरी ग्रुप ला द्यावी. शिवनेरीच्या या उपक्रमाला नागरिकानी प्रतिसाद दिला. कपडे, शालेय साहित्य, पेपरची रद्दी गोळा झाली. मुलांनी रद्दी विकून त्या बदल्यात वह्या, पेन, पेन्सिल, रबर, शॉपनर व जॉमेट्री बॉक्स असे शालेय साहित्य विकत घेतले. जवळपास नऊशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. शिवनेरी ग्रुप ने फक्त खामगाव शहरातच नव्हे तर खामगाव तालुक्यातील शाळामध्ये उपक्रम राबिवला. या उपक्रमात लक्ष्मीनारायण संस्थेचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण, गुंजकर एज्युकेशन हबचे अध्यक्ष रामकृष्ण गुंजकर, दुर्गाशक्ती फुड्स प्रायव्हेट लिमिटेडचे शशिकांत सुरेका, श्री छत्रपती ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचे अध्यक्ष स्वप्निल ठाकरे, शिवनेरी ग्रुपचे अध्यक्ष किशोर लोखंडे, प्रकल्प प्रमुख पियुष अग्रवाल, सचिव जयेश जोशी, विनोद डीडवानिया, आनंद सुराणा, आनंद चांडक, रितेश निगम यांनी सहभाग घेतला.
 

Web Title: Shivneri Group; Distribution of school materials to 900 students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.