शेगाव : माजी नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला; नऊ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:01 AM2018-01-23T01:01:33+5:302018-01-23T01:01:53+5:30

शेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्‍वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यासह नऊ जणांना सोमवारी अटक करण्या

Shegaon: Attacked the former mayor's house; Nine suspects | शेगाव : माजी नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला; नऊ अटकेत

शेगाव : माजी नगराध्यक्षांच्या घरावर हल्ला; नऊ अटकेत

Next
ठळक मुद्देशेगावात लावलेल्या बॅनरवरून उफाळला वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव: माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे भाजप गटनेते शरद अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून शहरातील ज्ञानेश्‍वर पाटील व सर्मथकांनी २१ जानेवारी रोजी दुपारी १२.३0 वाजता शरद अग्रवाल यांच्या घरावर हल्ला केला असता तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर पाटील यांच्यासह नऊ जणांना सोमवारी अटक करण्यात आली. 
भाजप नेते शरद अग्रवाल यांचा २१ जानेवारी रोजी रविवारी वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे जाहिरातीचे बॅनर शहरात अनेक ठिकाणी लावण्यात आले होते. त्या बॅनरवर गावातील नामांकित व्यक्तींच्या नावांचा उल्लेख करण्यात आला. 
त्यावर एकच भाऊ, दादा, अण्णा, एकच समाजरत्न असे शब्दप्रयोग करण्यात आले आहेत. शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींना या नावाने संबोधल्या जात असल्याने शहरातील ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील  यांच्या जिव्हारी लागली व त्यांनी याचा वचपा काढण्यासाठी त्यांनी व सर्मथकांनी हातामध्ये लाकडी दंडे घेऊन  माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्या घराकडे मोर्चा वळवला. त्यांच्या घरासमोर मुर्दाबादच्या घोषणा आणि ईल शिवीगाळ करणे सुरू केले. 
त्यांच्या बंगल्याच्या लोखंडी दारावर लाथा मारल्या. माजी नगराध्यक्ष तथा नगरपालिकेचे गटनेते शरद अग्रवाल यांच्या घरासमोर काही मंडळी गोळी झाली असून त्यांना शिवीगाळ करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ठाणेदार डी.डी. ढाकणे हे ताफ्यासह  दाखल झाले. 
ठाणेदार ढाकणे यांनी जमावाला समजाविण्याचा प्रयत्न केला मात्र जमाव समजण्याच्या मानसिकतेत नव्हता. त्यामुळे त्यांना  पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकली, अशी माहिती ठाणेदार डी.डी. ढाकणे यांनी दिली. या प्रकरणी शरद शंकरलाल अग्रवाल यांनी शहर पो.स्टे ला फिर्याद दिली असता पोलिसांनी ज्ञानेश्‍वर पुरुषोत्तम पाटील, ज्ञानेश्‍वर गारमोळे, अजय पऊळ, अमोल ऊर्फ विक्की चव्हाण, पत्रकार मंगेश महादेवराव ढोले, विश्‍वजित शेळके, गोपाल हिंगणे, मंगेश ठाकरे सर्व रा. शेगाव या नऊ जणांविरुद्ध अप.क्र. ३७/१८ कलम १४३, ४४७, २९४, ५0६ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करून रात्री १ वाजताच्या सुमारास सर्व नऊ जणांना अटक करण्यात आली.  
 या प्रकरणातील आरोपींची तात्पुरत्या जामिनावर पोलिसांनी सुटका केली असली तरी शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक निखिल फटिंग हे करीत आहेत. 

Web Title: Shegaon: Attacked the former mayor's house; Nine suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.