शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 01:46 PM2017-11-20T13:46:58+5:302017-11-20T13:47:24+5:30

 हिवरा आश्रम: शुकदास महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्य गुरुवारी विवेकानंद  विद्या मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनी आयोजित.

Science exhibition at Hivra Ashram | शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी

शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी

Next

 हिवरा आश्रम: शालेय शिक्षण घेत असतांना प्रत्येक विद्यार्थी हा पुस्तकी
ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून लवकर शिकत असतो. यासाठी त्याला
प्रयोगात्मक शिक्षणाची गरज असते. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना
त्यांच्या प्रयोगाला एक व्यासपिठ  मिळते, असे प्रतिपादन जिल्हा
शल्यचिकीत्सक डॉ.सरीता पाटील यांनी केले.
शुकदास महाराज यांच्या ७४ व्या जयंतीनिमित्य गुरुवारी विवेकानंद  विद्या
मंदीर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनी च्या उद्घाटन
प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विवेकानंद आश्रम चे अध्यक्ष रतनलाल
मालपानी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, प्राचार्य निवृत्ती
शिंदे, उपप्राचार्य अनाजी सिरसाट, पर्यवेक्षक प्रा.कैलास भिसडे आदी
उपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी मुक्त गोठा, बंदीस्त
शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, ठिबक सिंचन, सौर उर्जेवर चालणारे पंप,
पेरणी यंत्र, पेरीस्कोप, घरगुती व्ह्ँक्युम क्लिनर, सोलर हिटर यासारखे
अनेक उपकरणासह सहभाग नोंदविला होता. विज्ञान प्रदर्शनीचे दोन गट करण्यात
आले होते. यामध्ये वर्ग पाच ते आठ व वर्ग नऊ ते बारा अशी विभागणी करण्यात
आली. पहील्या गटातून प्रथम क्रंमाक रोहीनी राजू गुंजकर उपकरण बहूपयोगी
पेरणीयंत्र, द्वितीय रुषिकेश रमेश पायघन उपकरण बहूउद्देशिय सोलर सेल तर
तृतीय क्रमांक हर्षदिप कृष्णा  गवई व वैभव गजानन हाडे उपकरण पेरीस्कोप
यांनी पटकावले. दुसºया गटातून प्रथम क्रमांक महेश दीपक पागोरे व कार्तिक
मोहन देवकर उपकरण व्हँक्युम क्लिनर, द्वितीय क्रमाक संतोष गुलाबराव तुपकर
व अजय विजय जाधव उपकरण सोलर हिटर तर तृतीय क्रमांक क्रांती जिवन केंदळे व
आकांक्षा गजानन अंभोरे उपकरण हँडमेड हिटर यांनी प्राप्त केला. या
प्रदर्शनात उपकरणांची निवड करण्यासाठी तज्ञ चमुंनी काम पाहीले. यामध्ये
आत्माराम जामकर, कमलेश  बुधवानी, प्रा.गजानन तायडे, विजय गोसावी,
श्रीकृष्ण  दळवी, श्याम रामेकर, प्रा.श्रीकांत दाभाडे यांचा समावेश होता.

आधुनिकीकरण काळात यांत्रीक शेती करणे गरजेचे आहे. मनुष्य बळाची कमतरता व
वेळ वाचविण्यासाठी हे पेरणी यंत्र अंत्यत उपयुक्त. सध्याच्या शेतीच्या
काळात कमीत कमी खर्चाचे हे पेरणी यंत्र तयार केल्या जाते. या यंत्राच्या
माध्यमातून पेरणी बरोबरच खते देण्यात येतात. सदर उपकरण रोहीनी राजू
गुंजकर हिने सहाय्यक शिक्षक सदानंद शेळके यांच्या मार्गदर्शनात तयार केले
असून याच उपकरणाने प्रथम क्रमांक पटकाविला.

Web Title: Science exhibition at Hivra Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.