महसूल प्रशासनाकडून मलकापूर तालुक्यात हेलीपॅडसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:14 PM2018-01-13T12:14:21+5:302018-01-13T12:20:41+5:30

मलकापूर तालुक्यातील हेलीपॅड करिता लागणारी जागा निश्चितीकरिता स्थानिक महसूल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर होणार आहे.

Revenue administration survey of land for helipad in Malkapur taluka | महसूल प्रशासनाकडून मलकापूर तालुक्यात हेलीपॅडसाठी जागेची पाहणी

महसूल प्रशासनाकडून मलकापूर तालुक्यात हेलीपॅडसाठी जागेची पाहणी

googlenewsNext
ठळक मुद्देदसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची केली पाहणीलवकरच जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणारा प्रस्ताव

मनोज पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने पुरामध्ये अथवा अन्य आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी हेलीपॅड निर्मितीचे कार्य  जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने मलकापूर तालुक्यातील हेलीपॅड करिता लागणारी जागा निश्चितीकरिता स्थानिक महसूल प्रशासनाने दसरखेड एमआयडीसी परिक्षेत्रात अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी बुलढाणा यांचेकडे सादर होणार आहे.
महसूल व वनविभाग मदत व पुनर्वसन मंत्रालयाच्या वतीने १७ नोव्हेंबर २०१७ शासन निर्णयानुसार आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर व मोताळा या प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायम स्वरुपी हेलीपॅड बांधण्याबाबत धोरण आखण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने पुरामध्ये किंवा अन्य आपत्तीमध्ये अडकलेल्या व्यक्तींच्या बचावासाठी प्रत्येक तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कायम स्वरुपी हेलीपॅड तयार करण्याची आवश्यकता असल्याची बाब त्या धोरणात प्रकर्षाने नमुद करण्यात आली आहे.
यामध्ये पुरुष मुख्यालयास जागा निश्चीत करणे हेलीपॅडचे लॅडींग व टेकींग आॅफच्या दृष्टीकोनातुन हेलीपॅड बांधण्यासाठी कायमस्वरुपी सुरक्षित जागा शोधणे व भविष्यात तेथून एचटीएल किंवा अन्य कोणतेही अडथळे येणार नाही याची खात्री करणे या सारखे आदेश व सुचना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार यांना दिले आहेत. त्या अनुषंगाने तहसिलदार विजय पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता, अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी एम.आय.डी.सी.चे स्थानिक अधिकारी यांना सोबत घेऊन दसरखेड एमआयडीसी परिसरातील अ‍ॅमेनिटी स्पेसची पाहणी केली असून त्यासंदर्भात प्रस्ताव लवकरच तयार होऊन जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात येणार आहे

Web Title: Revenue administration survey of land for helipad in Malkapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.