बुलडाण्यात येथे शीघ्र कृती दलाचे पथसंचलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:37 AM2018-02-09T00:37:34+5:302018-02-09T00:37:43+5:30

बुलडाणा :   केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत शीघ्र कृती दलाच्यावतीने गुरुवारी शहरात पथसंचालन करण्यात आले. शहर  पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, दलप्रमुख एसीपी रोहित सिंह, रमेश वर्मा यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन झाले.

Rapid Transit of Action Branches at Buldana | बुलडाण्यात येथे शीघ्र कृती दलाचे पथसंचलन

बुलडाण्यात येथे शीघ्र कृती दलाचे पथसंचलन

googlenewsNext
ठळक मुद्दे बुलडाणा शहरानंतर जिल्ह्यातील इतर शहरातही हे दल जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :   केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत शीघ्र कृती दलाच्यावतीने गुरुवारी शहरात पथसंचालन करण्यात आले. शहर  पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव, दलप्रमुख एसीपी रोहित सिंह, रमेश वर्मा यांच्या नेतृत्वात हे पथसंचलन झाले.
 दंगल स्थळी, हिंसाचार थांबवण्यासाठी व सर्व काही पूर्वपदावर आणण्यासाठी अती शीघ्र कृती दल म्हणजे रॅपिड अँक्शन फोर्सला पाचारण करण्यात येते. राज्यातील संवेदनशील भागात व शहरात जाऊन हे दल पथसंचलन करते. राज्यात ३६ जिल्हे असून, शासकीय रेकॉर्डनुसार त्यापैकी २५ जिल्हे अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी रॅपिड अँक्शन फोर्स दरवर्षी जाऊन पथसंचलन करतात. मागील व चालू घडामोडीचा आढावा घेतला जातो. गुरुवारी बुलडाणा शहरात हे विशेष दल दाखल झाले. बुलडाणा शहरानंतर जिल्ह्यातील इतर शहरातही हे दल जाणार आहे. रॅपिड अँक्शन फोर्सचे मुख्यालय नवी मंबईत आहे. हे दल केंद्रीय गृहविभागाच्या अखत्यारीत काम करीत असल्याची माहिती या दलाकडून देण्यात आली.

Web Title: Rapid Transit of Action Branches at Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.