राजूर घाट-हरमोड धरण नालाखोलीकरणास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 06:13 PM2019-02-23T18:13:25+5:302019-02-23T18:13:29+5:30

बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटातील टेकड्यांचे वाहून जाणारे पाणी मुर्ती-हरमोड पाझर तलावात पोहोचविण्यासाठी परिसरातील नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.

Rajur Ghat-Harmod trench drain start | राजूर घाट-हरमोड धरण नालाखोलीकरणास प्रारंभ

राजूर घाट-हरमोड धरण नालाखोलीकरणास प्रारंभ

Next

बुलडाणा: शहरा लगतच्या राजूर घाटातील टेकड्यांचे वाहून जाणारे पाणी मुर्ती-हरमोड पाझर तलावात पोहोचविण्यासाठी परिसरातील नाला खोलीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, हे काम पूर्णत्वास गेल्यास भविष्यात या भागात सिंचनाच्या सुविधेसह पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होईल, असे मत माजी आ. विजयरा शिंदे यांनी व्यक्त केले.
या कामाच्या प्रारंभ प्रसंगी टाकळीचे सरपंच तुळशीराम सपकाळ, इखरचे व्यवस्थापक प्रवीण वरकडे, माजी सभापती तेजराव पाटील, महादेव शिराळ प्रामुख्याने उपस्थित होते. मुर्ती फाट्याच्या बाजूला असलेला हरमोड हा सिंचन विभागाचा पाझर तलाव असून पर्जन्यमान कमी झाल्याने गेल्या २५ वर्षात हा तलाव भरलेला नाही. राजूर घाटातील राजूर, मोहेंगाव गावाच्या पूर्वेकडील टेकड्यांवरील पावसाचे वाहून जाणारे पाणी हरमोड धरणात सोडल्यास धरण भरले व परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल अशी परिसरातील राजूर, मुर्ती,  वाघजाळ, टाकळी, वारूळी, मोहेगाव सह परिसरातील ग्रामस्थानी केली होती. गेल्या वर्षीपासून ही मागणी पुढे येत आहे.  त्यासंदर्भाने माजी आमदार विजयराज शिंदे जिल्हा परिषदेचे तत्कालीन सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता काळवाघे यांची भेट घेतली होती. त्यानुसार या कामाचे अंदाजपत्रकही बनविण्यात आले होते. आता बीजेएसने जेसीबीसह अन्य यंत्रसामुग्री पुरवली असून शासन त्यासाठी इंधन पुरवठा करणार आहे. त्यानुषंगाने हे काम आता मार्गी लागले असून त्याच्या कामास गुरूवार पासून प्रारंभ झाला.
यावेळी समाधान लोखंडे, विवेक वर्हाडे, माधव शिराळ, गजानन पाटील, कैलास पाटील, पंडितराव शिवणेकर, सचिन शेळके, नारायण काटे, ज्ञानेश्वर खंडागळे, सुभाषसिंग राजपूत, ओमसिंग राजपूत, चंद्रकांत काटकर यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Web Title: Rajur Ghat-Harmod trench drain start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.