बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:12 PM2018-12-29T13:12:19+5:302018-12-29T14:38:42+5:30

बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.

procession of Shankaracharya, gurupithadhish in buldana | बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

बुलडाण्यात शंकराचार्य, गुरूपिठाधीशांची मिरवणूक

googlenewsNext

बुलडाणा: वैदिक परंपरेचे संकेश्वर पीठाचे शंकराचार्य व वारकरी परंपरेचे गुरूपीठाधीश यांच्याहस्ते स्थानिक कारंजा चौक दुर्गामाता मंदीर समितीच्यावतीने २९ डिसेंबर रोजी माँ नवदुर्गा यज्ञ सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला बुलडाणा शहरातून शंकराचार्य व गुरूपिठाधीश यांची सजवलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात आली. या  मिरवणूकीत महिला व पुरूषांच्या पारंपारीक वेशभुषेचे दर्शन घडले.
बुलडाणा येथील कारंजा चौक दुर्गामाता मंदीर समितीच्यावतीने माँ नवदुर्गा यज्ञ व पुन: प्राणप्रतिष्ठा उत्सव २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत संपन्न होत आहे. या उत्सवासाठी जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामी संकेश्वर पीठ (कर्नाटक) व गुरूपिठाधीश अ‍ॅड. रंगनाथ महाराज पितळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. शनिवारला दुपारी १२ वाजता संपुर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये सर्व भाविक भक्त पारंपारीक वेषात सहभागी झाले होते. उत्सवाच्या पहिल्या दिवशी दशवीधान स्नान, पुण्याहवचन, प्रयश्चितत होम, मातृकापुजन, मंडप प्रवेश नंदश्रद्धांत कर्म, गणपती पूजन, देवतस जालाधीवास नंतर वास्तू मंडल, योगीनी मंडल, क्षेत्रपाल मंडल, मुख्य मंडल स्थापन सप्तशती पाठी आदी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. यावेळी भाविकांची मांदियाळी जमली आहे. 

Web Title: procession of Shankaracharya, gurupithadhish in buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.