बुलडाणा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 12:17 PM2018-08-10T12:17:30+5:302018-08-10T12:20:00+5:30

बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशीही मिरवणूक होती. 

The procession on the occasion of Veer Ekalavya Jayanti in Buldhana city | बुलडाणा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

बुलडाणा शहरात वीर एकलव्य जयंतीनिमित्त मिरवणूक

googlenewsNext
ठळक मुद्दे भिलवाडा वस्तीमध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीर एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन झाले. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशी ही मिरवणूक होती. 


बुलडाणा : शहरातून शोभायात्रा काढून वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपारीक लोकनृत्य, महापुरुषांच्या भव्य प्रतिमा, एकलव्याची मोठी मूर्ती, रथ अशी ही मिरवणूक होती. 
जयंती उत्सवाची सुरुवात सकाळपासून झाली. येथील भिलवाडा वस्तीमध्ये सकाळी ११ वाजेच्या दरम्यान वीर एकलव्यांच्या मूर्तीचे पूजन झाले. आमदार राहुल बोंद्रे,  न.प. उपाध्यक्ष विजय जायभाये, माजी आमदार विजयराज शिंदे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड, शिवसेना नेते संजय हाडे, मृणालिनीताई सपकाळ, नंदिनी टारपे, काँग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यांच्यासह समितीचे अध्यक्ष विनोद ठाकरे, वसंत बरडे, गुलाबराव ठाकरे, डॉ. राजेश टारपे, आरोग्य सभापती कैलास माळी, उत्तम मोरे, विनोद डाबेराव, अरूण बरडे, बाळू मोरे, संजय मोरे, कडूबा मोरे, अनिल पिंपळे, गजानन सोळंकी, विक्रम मोरे, एकनाथ बरडे, लक्ष्मण गायकवाड, गटलूबा बरडे, किशोर ठाकरे, संदीप गायकवाड आदी उपस्थित होते. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास शोभायात्रेला प्रारंभ झाला. या शोभायात्रेत पारंपारीक लोकनृत्य सादर करण्यात आले. लाल रंगाचे फेटे घालून पुरुष तर लाल रंगाच्या साड्या परिधान करून अनेक महिला आदिवासी वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समिती अध्यक्षांसह लखन ठाकरे, सतिष मोरे, दिलीप पवार, विजुराम मोरे, सुनिल बरडे, उमेश बरडे, संतोष मोरे, मनोज ठाकरे, बंडू ठाकरे, रवि मोरे, विशाल गायकवाड, संदीप बरडे, राज मोरे, प्रविण बरडे, विनोद माळी, चंद्रकांत बरडे, सतिष बरडे, नितीन बरडे, संजु बरडे तथा समितीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. ९ आॅगस्ट रोजी बंदच्या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच ही जयंती साजरी करण्याचा निर्णय झाला होता.

Web Title: The procession on the occasion of Veer Ekalavya Jayanti in Buldhana city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.