भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:19 PM2018-03-20T13:19:49+5:302018-03-20T13:19:49+5:30

शेगाव : रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.

Primary health center doctor commit suicide | भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची आत्महत्या

भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरची आत्महत्या

googlenewsNext
ठळक मुद्दे डॉ. धिरज प्रकाश जमादार यांनी खामगाव-शेगाव रोडवरील रसिका धाब्याजवळ त्यांच्या घरात आत्महत्या केली.त्यांचा सोमवारी एका रुग्णासोबत वाद झाला होता. मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

शेगाव : रुग्णाचे बोलणे सहन न झाल्याने तालुक्यातील भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे उघड झाले.
भोनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. धिरज प्रकाश जमादार (वय ३०) यांनी खामगाव-शेगाव रोडवरील रसिका धाब्याजवळ त्यांच्या घरात आत्महत्या केली. त्यांचा सोमवारी एका रुग्णासोबत वाद झाला होता. रुग्णाने त्यांना टॉनिक मागितले पण उपलब्ध नसल्याने गोळ््या देवू शकतो असे ते म्हणाले. त्यामुळे रुग्णासोबत त्यांचा वाद झाला. या सर्व प्रकाराचा त्यांना मानसिक त्रास झाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेचा तपास शेगाव पोलिस करीत आहेत.

Web Title: Primary health center doctor commit suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.