पुरोहितसह मुलीच्या माता, पित्यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 01:19 AM2017-11-22T01:19:32+5:302017-11-22T01:21:45+5:30

गर्भपातादरम्यान अल्पवयीन मुलीच्या १८ डिसेंबर रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. सुभाष पुरोहित आणि मृत मुलीचे आई- वडील अनुक्रमे लता भोसले, पन्नाशा भोसले यांना मंगळवारी न्यायालयाने  २७  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Police custody of the girl's parents, along with the priest | पुरोहितसह मुलीच्या माता, पित्यांना पोलीस कोठडी

पुरोहितसह मुलीच्या माता, पित्यांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू२0 आठवड्यांची होती गर्भवती

लोकमत न्यूज नेटवर्क 
लोणार: गर्भपातादरम्यान अल्पवयीन मुलीच्या १८ डिसेंबर रोजी झालेल्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या डॉ. सुभाष पुरोहित आणि मृत मुलीचे आई- वडील अनुक्रमे लता भोसले, पन्नाशा भोसले यांना मंगळवारी न्यायालयाने  २७  नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 रविवारी या प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी आकसमिक मृत्यूची नोंद केली होती; मात्र  शवविच्छेदनादरम्यान अल्पवयीन मुलगी ही २0 आठवड्यांची गर्भवती असल्याचे  समोर आले होते. त्यानंतर या प्रकरणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर अवैधरीत्या  गर्भपात केल्याप्रकरणी डॉ. सुभाष पुरोहित, मृत मुलीचे वडील पन्नाशा भोसले आणि  आई लता भोसले यांना सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती.  दरम्यान, या अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादणारा आरोपी मात्र अद्यापही मोकाटच  आहे.
दुसरीकडे अल्पवयीन असल्याने तथा गर्भपातादरम्यान मोठय़ा प्रमाणावर रक्तस्त्राव  झाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप  भटकर, डॉ. राजश्री बनसोडे, स्रीरोग तज्ज्ञ डॉ. लोणकर मृत मुलीचे शवविच्छेदन  केले होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता पाटील यांनी अख्खा एक दिवस  आणि रात्र या प्रकरणात बारकाईने लोणारात चौकशी व पाहणी केली होती. त्यानंतर  वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप भटकर यांच्या तक्रारीवरून साईकृपा क्लिनिक सील  करण्यात आले होते.  पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर थोरात, पोलीस उपनिरीक्षक उकंडराव राठोड, पोलीस  हेडकॉन्स्टेबल गजानन तायडे, गुलाब झोटे, चंद्रशेखर मुरडकर, प्रदीप सोनुने, शेखर  थोरात, कैलास चतरकर, रवीद्र बोरे, संतोष चव्हाण तपास करीत आहेत. 

२0 आठवड्यांची होती गर्भवती
मृत झालेली अल्पवयीन मुली २0 आठवड्यांची गर्भवती होती. शवविच्छेदन  अहवालादरम्यान हा प्रकार समोर आला. १८ नोव्हेंबरला तिला साईकृपा  िक्लनिकमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला  होता. त्यानंतर गोंधळ झाल्याने या संपूर्ण प्रकरणाचे बिंग फुटले होते.
 

Web Title: Police custody of the girl's parents, along with the priest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.