प्लास्टिक बंदी: खामगाव पालिकेचा कारवाईचा षटकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:22 PM2018-07-17T13:22:13+5:302018-07-17T13:25:58+5:30

ही पालिकेची सहावी कारवाई असून आतापर्यंत तीस हजाराचा दंड वसूल केला आहे.

Plastic Ban: A six-sided action of Khamgaon Municipal | प्लास्टिक बंदी: खामगाव पालिकेचा कारवाईचा षटकार 

प्लास्टिक बंदी: खामगाव पालिकेचा कारवाईचा षटकार 

googlenewsNext
ठळक मुद्देकमी जाडीच्या पिशव्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. खामगाव पालिकेच्यावतीने शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. प्लास्टिक निमूर्लन पथकाने बाजारातील भारत ट्रेडर्सचे संचालक नरेश नागवाणी यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव: प्लास्टिक पिशव्याचा वापर करणे आणि प्लास्टिक वापरास प्रोत्साहन देणाऱ्या विरोधात पालिका प्रशासनाने मोहिम उघडली आहे. मंगळवारी पालिकेने प्लास्टिक बंदीत प्लास्टिक पिशव्याची विक्री करताना आढळून आल्याने एका व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. ही पालिकेची सहावी कारवाई असून आतापर्यंत तीस हजाराचा दंड वसूल केला आहे.

राज्य शासनाने प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी घातली आहे. कमी जाडीच्या पिशव्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. त्यानुसार खामगाव पालिकेच्यावतीने शासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, मंगळवारी पालिकेच्या प्लास्टिक निमूर्लन पथकाने बाजारातील भारत ट्रेडर्सचे संचालक नरेश नागवाणी यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. नागवाणी यांच्याकडून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने सहा व्यापाºयांवर दंडात्मक कारवाई करीत प्रत्येकी ५ हजाराप्रमाणे ३० हजाराचा दंड वसूल केला आहे. प्लास्टिक निमुर्लन पथकाचे शंकर नेहारे, मोहन अहीर, सुनील सोनोने, विक्की सारसर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Plastic Ban: A six-sided action of Khamgaon Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.