खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 02:10 PM2019-07-22T14:10:01+5:302019-07-22T14:10:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव :  'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.               ...

Plantation under 'Project O-2' at Khamgaon! | खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण!

खामगाव येथे 'प्रोजेक्ट ओ-२' अंतर्गत वृक्षारोपण!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  'प्रोजेक्ट ओ-२'अंतर्गत शहरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले.                      मुक्तांगण फाऊंडेशनच्या वतीने रविवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत फक्कड देवी, गौरक्षण परिसर खामगाव येथे डॉ. कालिदास थानवी यांच्या संकल्पनेतून  स्थानिक नागरिकांच्या मदतीने १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.  
माणसाला निसर्गाशिवाय पर्याय नाही,आपण कितीही प्रगती केली अन्न ,हवा,पाणी ही मानवाची प्राथमिक गरज आहे आणि ही गरज निसर्ग विनामूल्य पुरवत असतो. परंतू मनुष्य हा अत्यंत लोभी प्राणी असल्यामूळे आपल्या गरजा अवास्तव करुन ठेवल्या आहेत आणि यातूनच निसर्गाला अतोनात हानी पोहचवत आहे. परंतू निसर्गाला परत देण्याचे काम फार तुरळक लोक करतांना दिसतात हे प्रमाण वाढावं या साठी डॉ थानवी  यानी " प्रोजेक्ट ओ 2" ( project O2) ही अभिनव संकल्पना मांडली. माणसाला सर्वात जास्त गरज असते ती ओक्सिजन ची व ती गरज फक़्त झाडेच पुरवतात म्हणून ही झाडे जगवने काळाची गरज बनली आहे. मुक्तांगण नेहमीच पर्यावरणाच्या कार्यात अग्रेसर असते त्यामूळे ह्या प्रकल्पा अंतर्गत 100 वृक्ष लावण्याचे नियोजन करण्यात आले होते परंतू वृक्षारोपण करुन चालणार नाही तर त्याचे संवर्धन सुद्धा व्हायला पाहिजे त्यामूळे स्थानिक नागरिक यांच्याशी संवाद साधून 100 वृक्ष  लावण्यात आले.या झाडाचे संगोपन व्हावे यासाठी फायबरचे ट्री गार्ड बसवण्यात आहे. या उपक्रमा अंतर्गत कडुलिंब , गुलमोहर, बहावा, चिंच,कारनेट,कडू बदाम, बेल, पिंपळ जामुन आदी झाड़ानची  लागवड करण्यात आली. या उपक्रमात  महिला मंडळी , लहान  मुलं मुली,स्थानिक तरुण ह्यानी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला .

Web Title: Plantation under 'Project O-2' at Khamgaon!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.