शारीरिक शिक्षकांच्या माहितीचा ‘खेळ खंडोबा’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:07 PM2019-01-23T18:07:59+5:302019-01-23T18:08:46+5:30

बुलडाणा: मुलांना शारीरिक शिक्षणाचे व खेळाचे धडे देणाºया शारीरिक शिक्षकांच्या संख्येबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे वास्तव शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आले आहे

Physical education teacher information not awailabele | शारीरिक शिक्षकांच्या माहितीचा ‘खेळ खंडोबा’!

शारीरिक शिक्षकांच्या माहितीचा ‘खेळ खंडोबा’!

googlenewsNext

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: मुलांना शारीरिक शिक्षणाचे व खेळाचे धडे देणाºया शारीरिक शिक्षकांच्या संख्येबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय अनभिज्ञ असल्याचे वास्तव शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील शिक्षकांविषयी अद्ययावत माहितीचा ‘खेळ खंडोबा’ निर्माण झालाचे चित्र दिसून येत आहे. सध्या शिक्षकांची संख्या कमी झाल्याने अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासीका कमी करण्याची वेळ आली आहे.
मुलांना शाळेमध्ये अभ्यासाबरोबरच शारीरिक शिक्षण हा विषयही अत्यंत महत्त्वाचा असतो. शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे हे शिक्षण मुलांना शाळेमध्ये दिल्या जातो. शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शारीरिक विकास येवढेच नाही, तर मन, भावना, विचार व संस्कार हे सुद्धा आहेत. त्यासाठी प्रत्येक शाळेत शारीरिक शिक्षकाचे पद निर्माण करण्यात आले आहे. मात्र अनेक संस्थाचालक शारीरिक शिक्षक पदे भरून सुद्धा त्या शिक्षकांना इतर विषय शिकवायला लावत असल्याचे दिसून येते. शिक्षकांची सर्व अद्ययावत माहिती ही तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये आणि त्यानंतर संपुर्ण जिल्ह्याची माहिती प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात असते. परंतू शिक्षकांची ही माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी स्थानिक माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय याला अपवाद ठरत आहे. २४ जानेवारी रोजी शारीरिक शिक्षक दिन असून त्यानुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील शारीरिक शिक्षकांची माहिती विचारली असता त्यांचेकडे यासंदर्भात कुठलाच ‘डाटा’ उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या कार्यालयात जिल्ह्यात किती शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत, याची सुद्धा माहिती उपलब्ध नसल्याचे दिसून आले. शासन शारीरिक शिक्षणाकडे लक्ष देत असताना अधिकारी मात्र शारीरिक शिक्षणाला किती गांभीर्याने घेतात, याचा प्रत्यय शारीरिक शिक्षक दिनाच्या पूर्वसंधेला आला. 

शारीरिक शिक्षकांवर गणीत, इंग्रजीचा भार
शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचे महत्त्वाचे कार्य शारीरिक शिक्षक करत असतात. मात्र जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये शारीरिक शिक्षकांकडे गणीत व इंग्रजीचे विषय दिले जात असल्याची माहिती मिळाली आहे. 


शारीरिक शिक्षकांची संख्या गटशिक्षणाधिकाºयांकडे मिळेल. तसे प्रत्येक शाळेवर शारीरिक शिक्षक उपलब्ध आहेत. एखाद्या संस्थेवर शिक्षकांच्या कार्यरत पदानुसार शारीरिक शिक्षक दुसरा विषय शिकवतात. 
- एस. एस. काळुसे,
उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक बुलडाणा. 

Web Title: Physical education teacher information not awailabele

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.