मुक्त विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आठ जूनपासून ; राज्यात ७३६ परीक्षा केंद्र 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 04:45 PM2018-06-07T16:45:58+5:302018-06-07T16:50:35+5:30

बुलडाणा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मे पासून सुरु आहेत. मात्र २८ मे रोजी पालघर, भंडार-गोंदिया या मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीमुळे  त्या दिवशीची परीक्षा रद्द झाली होती. त्यातील बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे.

Open University Examination canceled on 8th June | मुक्त विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आठ जूनपासून ; राज्यात ७३६ परीक्षा केंद्र 

मुक्त विद्यापीठाच्या रद्द झालेल्या परीक्षा आठ जूनपासून ; राज्यात ७३६ परीक्षा केंद्र 

Next
ठळक मुद्दे २८ मे रोजी महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया या मतदार संघात लोकसभा पोटनिवडणूकीमूळे पेपर रद्द करण्यात आला होता.  यात वृत्तपत्रविद्या या अभ्यासक्रमाचा पेपर जून मे रोजी घेण्यात येणार आहे. बीबीए अभ्यासक्रमाचा पेपर १४ जून रोजी घेण्यात येणार आहे. 

- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातंर्गत विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा २५ मे पासून सुरु आहेत. मात्र २८ मे रोजी पालघर, भंडार-गोंदिया या मतदार संघातील लोकसभा पोटनिवडणुकीमुळे  त्या दिवशीची परीक्षा रद्द झाली होती. त्यातील बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे.
शिक्षणापासून वंचित असलेल्या व्यक्तींसाठी दूरशिक्षण ही एक चांगली संधी असून, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे अनेकांना ही संधी  उपलब्ध आहे. नियमित वर्गात न जाता आपली नोकरी सांभाळून आणि आपल्या सोईच्या वेळेत अभ्यास करून आज लाखो विद्यार्थी मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण  करत आहेत.  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे सत्रातील परीक्षांना २५ मेपासून प्रारंभ झाला असून, राज्यातील ७३६ परीक्षा केंद्रांवर विविध शिक्षणक्रमांच्या अंतिम व सत्रनिहाय परीक्षा सुरू आहेत. नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नांदेड, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नाशिक या आठ विभागीय केंद्रांवर ह्या परीक्षा होत आहे. दरम्यान,  २८ मे रोजी महाराष्ट्रातील पालघर, भंडारा-गोंदिया या मतदार संघात लोकसभा पोटनिवडणूकीमूळे पेपर रद्द करण्यात आला होता.  रद्द झालेला हा पेपर ज्या अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर संपेल त्याच्या दुसºया दिवशी लगेचच घेतला जाणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली होती. मात्र त्या पेपरचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात आले. यातील काही अभ्यासक्रमांचे रद्द झालेले पेपर घेण्यात आले असून बी.ए., एमबीए, बी.कॉम  वृत्तपत्रविद्या, या अभ्यासक्रमाच्या परीक्षा आठ जूनपासून घेण्यात येत आहे. यात वृत्तपत्रविद्या या अभ्यासक्रमाचा पेपर जून मे रोजी घेण्यात येणार आहे. एमबीए अभ्यासक्रमाचा पेपर ११जून, बी.ए. आणि बीकॉम या अभ्यासक्रमाचा पेपर १३ जून रोजी होणार आहे. बीबीए अभ्यासक्रमाचा पेपर १४ जून रोजी घेण्यात येणार आहे. 
 
५ लाख ८३ हजार परीक्षार्थी
राज्यातील ७२६ परीक्षा केंद्रांवरून सुमारे ६ लाख ४५ हजार १५७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. बी.ए. बीकॉम, बीएस्सी, बी-लिब, वृत्तपत्रविद्या, कृषी, वाणिज्य, व्यवस्थापन, संगणकशास्त्र, आरोग्य आदी विविध ९६ अभ्यासक्रमांच्या १ हजार २३ विविध विषयांच्या परीक्षा सुरू आहेत. सुमारे ५ लाख ८३ हजार ७३० परीक्षार्थीचा समावेश आहे.  
 

Web Title: Open University Examination canceled on 8th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.