ठळक मुद्देमलकापूर शहरात ठिकठिकाणी अस्वच्छतानागरिक बेहाल 

मनोज पाटील। 
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: शहरातील मोकळ्य़ा जागा हय़ा ओपन बार बनल्याचे दिसून ये त आहे. यामुळे ठिकठिकाणी अस्वच्छता व दुर्गंधी पसरली असून,  नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. 
धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी उद्यान व मैदान  या दोन अत्यावश्यक बाबी आहेत. मात्र शहरात या बाबींची उणीव  असल्याने अनेक जण फिरण्याकरिता मोकळ्या जागांकडे आपली पावले  वळवितात; परंतु या मोकळ्या जागांना हेरत काही व्यसनाधीन तरुणांनी  आपला अड्डा बनविल्याने या परिसरात काचेच्या बाटल्या, पाणी पाऊच,  गुटख्याच्या पुड्या, सिगारेट पाकिटे आदी तत्सम कचर्‍याचा ढीग अस् ताव्यस्त स्वरूपात आढळून येत असल्याने मोकळ्या जागा म्हणजे ओपन  बार बनल्या असल्याचा प्रत्यंतर मलकापुरात येत आहे.
शहरामध्ये उद्यान आहे; परंतु फिरण्याकरिता त्याकडे बोटावर मोजण्याइ तकेच ज्येष्ठ नागरिक जातात. मैदानांचा अभाव असल्याने अनेक जण  मोठय़ा संख्येने वाहतुकीचा रस्ता धरतात; मात्र वाहतुकीचे रस्ते सोयीचे  नसल्याने मोठय़ा प्रमाणात शहरातील नागरिक हे नवीन परिसरात  फिरण्याकडे कल देतात. यामध्ये प्रामुख्याने बिर्ला मंदिरामागील मोकळी  जागा, बुलडाणा रोडवरील मीरा नगर परिसर, पंचमुखी हनुमान मंदिर  मागील घिर्णी रोड, गजानन नगरी आदी भागांना प्राधान्य देतात. या  परिसरात अकृषक जमिनीवर घरे बांधणी सुरू असून, अद्याप पावेतो  पाहिजे त्या प्रमाणात नागरिक राहायला गेलेले नाहीत.
हा परिसर शहराबाहेरील नवीन वस्त्यांचा भाग असून, या भागांमध्ये वाह तूक नाही सारखीच असल्याने या ठिकाणी अनेक जण सकाळ,  संध्याकाळ फिरायला येतात; मात्र अंधार पडताच या ठिकाणांसह  क्रीडांगणावरसुद्धा अनेक व्यसनाधीन तरुण टोळक्याने येऊन आपला अड्डा  बनवितात. त्यामुळेच या ठिकाणी दिवसाच्या उजेडात ओपन बारचे पुरावे  आढळून येतात. प्रदूषणमुक्त परिसरात आढळणारे पुरावे परिस्थितीची  जाण करून देतात. अंधार पडताच या ठिकाणी टोळक्यांचा वावर वाढतो.  दुचाकी बाजूला लावून मदिरेचा आस्वाद घेतल्या जातो. सिगारेट ओढून  गुटख्याच्या पिचकार्‍या मारल्या जातात. पाणी पाऊच जागेवरच सोडून  दारू, बिअर व वाइनच्या काचेच्या बाटल्या फेकून दिल्या जातात. 

दारूड्यांच्या त्रासाने नागरिक वैतागले 
रात्रीच्या वेळी या मोकळ्या जागांवर मद्यपींचा पावर असल्याने सहसा  इकडे कुणी फिरकत नाही. याचाच फायदा घेऊन महाविद्यालयीन तरूण  सुध्दा या जागांना प्राधान्य देतात. कुणाचाही वरदहस्त नसल्याने या टोळ क्यांचे फावत असून या ओपन बार संस्कृतीला वेळीच आवर घालणे  गरजेचे झाले आहे. त्या अनुषंगाने या भागात पोलीस गस्त असावी अशी  अपेक्षा शहरातील सुजाण नागरिकांमधून व्यक्त केल्या जात आहे.