ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:11 AM2017-11-18T02:11:15+5:302017-11-18T02:11:22+5:30

मेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

One killed in a truck-bike accident | ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार

Next
ठळक मुद्देमेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
सुलतानपूर: मेहकर-सुलतानपूर मार्गावर सीतान्हानी नदीपुलाजवळ ट्रक-दुचाकीचा अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.
सिंदखेड राजा तालुक्यातील लिंगा येथील काशिनाथ मारोती नागरे (वय६0) आपल्या दुचाकी क्र.एम.एच.२८ एआर ६८0६ ने  पत्नीसह मेहकरवरून लिंगा येथे जात असताना सुलतानपूरजवळ रोडवरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करीत असताना मागून येणार्‍या ट्रक क्र.एम.एच.१६ सीए ७५९२ ने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकी चालक काशिनाथ नागरे हे ट्रकच्या चाकाखाली येऊन डोक्याला जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. सुदैवाने दुचाकीवर असलेली त्यांची  पत्नी थोडक्यात बचावली. अपघातस्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, अपघातस्थळी तत्काळ पोहोचून पोलीस कॉन्स्टेबल नवृत्ती सानप यांनी वाहतूक सुरळीत केली. मृतकास व त्याच्या पत्नीस मेहकर येथे हलविले.

Web Title: One killed in a truck-bike accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात