मलकापूरमध्ये मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 09:22 AM2019-01-23T09:22:40+5:302019-01-23T09:59:06+5:30

मलकापूरमध्ये बुधवारी (23 जानेवारी) मोटारसायकलचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

one dead in accident near malkapur buldhana | मलकापूरमध्ये मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

मलकापूरमध्ये मोटारसायकल अपघातात तरुणाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमलकापूरमध्ये बुधवारी (23 जानेवारी) मोटारसायकलचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मौजे धरणगाव येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.पवन उर्फ शुभम अनंत कोलते (23) असं तरुणाचं नाव असून तो बेन्झो केमिकल कंपनीत कार्यरत होता.

मलकापूर - मलकापूरमध्ये बुधवारी (23 जानेवारी) मोटारसायकलचा भीषण अपघात झाला असून यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. बेन्झो केमिकल कंपनीत रात्रपाळी करून घराकडे परतीच्या वाटेवर असताना अद्यात वाहनाने पाठीमागून दिलेल्या जबर धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मौजे धरणगाव येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

पवन उर्फ शुभम अनंत कोलते (23) असं तरुणाचं नाव असून तो बेन्झो केमिकल कंपनीत कार्यरत होता. रात्रपाळी आटोपून पवन त्याची मोटारसायकल हिरो पँशन क्र. एम.एच.२८/ए.एक्स.५१३९ ने घराकडे परतीच्या वाटेवर होता. राष्ट्रीय महामार्ग ६ वर मौजे धरणगाव येथील सोसायटी कार्यालयानजीक अद्यात वाहनाने मोटारसायकलीला पाठीमागून जबरदस्त धडक दिली. त्यामुळे घडलेल्या अपघातात पवनच्या डोक्यावर जबर मार बसल्याने तो जागीच ठार झाला. पवन कोलतेच्या मृत्यूची माहिती कळताच आदर्श नगरातील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली आहे. 

Web Title: one dead in accident near malkapur buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.