लोणारात येणाऱ्या शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 06:45 PM2018-12-18T18:45:24+5:302018-12-18T18:47:43+5:30

लोणार:  शैक्षणिक सहलींवरील कडक नियमावलींचा परिणाम लोणार पर्यटन स्थळावर झाला आहे. यामुळे लोणारात येणाºया शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले आहे.

The number of educational trips that arrived in Lonar reduced | लोणारात येणाऱ्या शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले

लोणारात येणाऱ्या शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले

Next

- किशोर मापारी

लोणार:  शैक्षणिक सहलींवरील कडक नियमावलींचा परिणाम लोणार पर्यटन स्थळावर झाला आहे. यामुळे लोणारात येणाºया शैक्षणिक सहलींचे प्रमाण घटले आहे. शिक्षणाधिकाºयांची परवानगी न घेता शैक्षणिक सहली काढल्यास सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक-प्राचार्यांवर कडक कारवाई करण्याचा फतवा शिक्षण विभागाने काढल्याने यावर्षी शैक्षणिक सहलींकडे शाळांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र दिसून येत आहे. 
लोणार येथे सरोवरापासून मंदिर व विविध प्राचीन कलाकृती पाहण्यासाठी शैक्षणिक सहली मोठ्या प्रमाणावर येतात.  प्राथमिक, माध्यमिक शाळा-महाविद्यालयांनी नियमानुसार सहलींचे आयोजन करावे. सहलीत अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक-प्राचार्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा सूचना शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, यंदा निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मक व अपघातस्थळी यापुढे शैक्षणिक सहली काढता येणार नसल्याने या वर्षात किती शाळा-कॉलेजांमधून सहली निघतील, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयांमधून दरवर्षी शैक्षणिक सहली काढण्यात येतात. गेल्या एक-दोन वर्षांपूर्वी सागर किनारी भागात व इतर काही निसर्गरम्य, पर्यटन, मनोरंजनात्मकस्थळी सहली काढण्यात आल्यानंतर त्याठिकाणी अपघात घडले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राणदेखील गमवावे लागले होते. याचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण विभागाने सहलींसाठी नियमावली प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयाने नियमानुसारच शैक्षणिक सहली काढाव्यात, अशी सूचना देण्यात आली आहे. स्थानिक शिक्षणाधीकाºयांकडून  परवानगी न घेता सहली काढल्यास मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
शिक्षण आयुक्तालय व शिक्षण संचालनालयाकडून सहलीला परवानगी दिलेल्या स्थानिक शिक्षण विभागाच्या कार्यालयांना दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर सरकारच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक सहली काढण्याबाबत नियमावली तयार करण्यात आली होती. या अशा जाचक अटींमुळे सहलींचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याचा परिणाम लोणारातील पर्यटनावर झाला आहे. 


सहलीदरम्यान अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक जबाबदार
विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक ज्ञानात व विकासात भर पडेल अशा शैक्षणिक, अभ्यासात्मक, संशोधनात्मक ठिकाणीच सहली काढाव्या लागणार आहेत. या सहली काढण्यापूर्वी त्याचे प्रस्ताव शिक्षणाधिकाºयांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाºया प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी हे आदेश आहेत. सहलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास मुख्याध्यापक, प्राचार्यांनाच जबाबदार धरण्यात येणार आहे.

 


शैक्षणिक सहलीसाठी या वर्षापासून शिक्षण विभागाने कडक अटी घातल्याने त्या पूर्ण करून घेण्यास वेळ जाणार आहे. खुरमपूर जिल्हा परिषद शाळेची सहल काढली आहे.
- शे. रा. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, लोणार.

Web Title: The number of educational trips that arrived in Lonar reduced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.