लोणार येथे राष्ट्रवादीचे ‘चणा मसाला’आंदोलन! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 02:04 AM2018-05-30T02:04:49+5:302018-05-30T02:04:49+5:30

लोणार: शासकीय तूर व हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांच्या घरी मोठय़ा प्रमाणावर हरभरा पडून आहे.  खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे न मिळाल्याने खरीप हंगामाच्या तयारीत असलेला शेतकरी आर्थिकष्ट्या हतबल झाला. तरीही सरकार काहीही ठोस निर्णय घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भास्कर मापारी यांच्या नेतृत्वात २९ मे रोजी नाफेड केंद्रावर अभिनव ‘चणा मसाला’ आंदोलन करण्यात आले.

NCP's 'Chana Masala' movement at Lonar | लोणार येथे राष्ट्रवादीचे ‘चणा मसाला’आंदोलन! 

लोणार येथे राष्ट्रवादीचे ‘चणा मसाला’आंदोलन! 

Next
ठळक मुद्देतूर, हरभरा खरेदी केंद्र बंद झाल्याने केला निषेध तुरीचे चुकारे त्वरित देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार: शासकीय तूर व हरभरा खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकर्‍यांच्या घरी मोठय़ा प्रमाणावर हरभरा पडून आहे.  खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे न मिळाल्याने खरीप हंगामाच्या तयारीत असलेला शेतकरी आर्थिकष्ट्या हतबल झाला. तरीही सरकार काहीही ठोस निर्णय घेत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भास्कर मापारी यांच्या नेतृत्वात २९ मे रोजी नाफेड केंद्रावर अभिनव ‘चणा मसाला’ आंदोलन करण्यात आले.
लोणार येथील नाफेड खरेदी केंद्रावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अभिनव असे चणा मसाला आंदोलन करण्यात आले. सध्या हरभरा व तुरीचे शासकीय खरेदी केंद्र बंद असल्याने  शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे. नुकतेच मान्सूनचे देशाच्या प्रवेशद्वारावर आगमन झाल्याने शेतकरी पेरणीपूर्व मशागतीत व्यस्त आहे. अशातच नाफेड केंद्रावर खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे शासनाने दिलेले नाहीत, तसेच जिल्हाभरात थोडाबहुत हरभरा खरेदी करण्यात आला; परंतु लोणार येथे हरभरा खरेदीचा शुभारंभसुद्धा होऊ शकला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या घरी मोठय़ा प्रमाणात हरभरा पडून आहे. एखादा पाऊस पडल्यास या हरभर्‍याला भोंग या किडीचा उपद्रव होऊ शकतो. या बाबींची दखल घेत बुलडाणा जिल्हा युवक राष्ट्रवादी उपाध्यक्ष डॉ. भास्कर मापारी व तालुका अध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी २९ मे रोजी चणा मसाला आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनात कष्टकरी व हमाल यांना मोफत चणा मसाला वाटप करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबतच शेतकरी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाल्याचे दिसून आले. या आंदोलनात प्रदेश प्रतिनिधी किशोर पाटील, डॉ. सेल जिल्हाध्यक्ष डॉ. विक्रांत मापारी, तालुका अध्यक्ष सदानंद तेजनकर, जि.प. सदस्य राजेश इंगळे, बाजार समिती सदस्य शिवप्रसाद बनकर, अंबादास खंड, कारभारी सौदर , शहर अध्यक्ष तौशिफ अलि, उमरभाई, रफीक शेठ, सालार भाई, इक्बाल, समाधान पोफळे, गणेश मापारी, गणेश ठाकूर, शंकर मापारी, सचिन मापारी, हर्षल पाटील, चित्रांन्ग काटकर, ओम शिंदे, वाजिद खान, मोहसिन खान व इतर शेतकरी मोठय़ा प्रमाणात हजर होते.

शिवसेना बाजार समिती सभापतींचा मज्जाव
बाजार समिती आवारात असलेल्या नाफेड खरेदी केंद्रावर चणा मसाला आंदोलनासाठी  शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते; मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवसेनेचे बाजार समिती सभापती गोविंद मापारी यांनी आंदोलन करण्यास मज्जाव केला. यामुळे काही वेळ तणावाचे वातारण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांच्या चोख बंदोबस्तामुळे अनुचित प्रकार घडला नाही. शेतकर्‍यांना व नागरिकांना चणा मसाला वाटून संतप्त राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी थेट तहसील कार्यालय गाठले व तहसीलदारांना निवेदन देऊन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

साठवणुकीसाठी खासगी गोदाम उपलब्ध झाल्यास लवकरच तूर व हरभरा खरेदी केंद्र सुरळीत सुरू करण्यात येईल.
- सुरेश कव्हळे, 
तहसीलदार, लोणार .

शिवसेनेचे बाजार समिती सभापती गोविंद मापारी यांनी आंदोलनास विरोध करणे  शेतकरी हिताच्या विरोधात आहे.   
- डॉ. विक्रांत मापारी,
 जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर सेल.

बाजार समिती आवारात आंदोलन करण्याअगोदर पूर्वकल्पना द्यायला हवी होती. आंदोलनास विरोध नाही. माल साठविण्यासाठी बाजार समितीच्या वतीने मोफत गोदाम दिलेले असून, तूर व हरभरा खरेदी सुरू करावी, अशी आमचीही मागणी आहे.
- गोविंद मापारी, 
सभापती, कृउबा, लोणार.
 

Web Title: NCP's 'Chana Masala' movement at Lonar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.