दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 05:50 PM2018-10-14T17:50:51+5:302018-10-14T18:02:31+5:30

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे.

'Narendra' for Teaching on drought, Lessons in the eyes of water conservation | दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

दुष्काळ निर्मूलनासाठी दिव्यदृष्टीतून 'नरेंद्र' देतोय जलसंधारणाचे धडे

Next

- योगेश फरपट
खामगाव : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून सिने-अभिनेता आमिर खान राज्यात जलसंधारणाची चळवळ राबवित आहे. याच चळवळीचा एक घटक असलेले अकोला-बुलडाणा जिल्हा समन्वयक नरेंद्र काकड हे डोळ्यांच्या माध्यमातून संवाद साधून युवकासह नागरिकांना जलसंधारणाचे धडे देण्याचे काम प्रभावीपणे करताना दिसत आहेत. आतापर्यंत बोलक्या बाहुल्यांचा खेळ बहुतांश लोकांनी पाहिला असेलच पण बोलक्या डोळ्यांचा संवाद ऐकण्यासाठी ग्रामीणच नव्हे शहरी भागात सुद्धा उत्सुकता वाढल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र काकड हे बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर असताना खामगाव येथे लोकमतशी संवाद साधला.

मानवी अवयवांपैकी डोळे हा सर्वात प्रभावशाली अवयव आहे. डोळे हा प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करणारा अवयव आहे. जी गोष्ट आपण बोलू शकत नाही. ती डोळ्यांच्या माध्यमातून व्यक्त केली जाते. राग, प्रेम, आपुलकी, भावना ह्या डोळ्यांतून व्यक्त होत असतात. खळखळणा-या हास्यासोबत औजस्वी डोळे असले की निश्चितच मैफील जिंकता येते. पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून गेल्या दोन-तीन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळमुक्तीसाठी प्रयत्न चालले आहेत. विविधपणे प्रशिक्षण देताना ग्रामीण व्यक्ती हीच या चळवळीचा खरा पाया आहे. ही चळवळ लोकांनी आता आपली मानली आहे.

या चळवळीच्या माध्यमातून गावाचा विकास साधण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला आहे. तशा प्रकारची उदाहरणे महाराष्ट्राभर पाहायला मिळत आहेत. जलसंधारणासोबत मनसंधारण व्हावं यासाठी ग्रामीण तथा शहरी भागातही कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागातील शाळा व शहरी भागातील महाविद्यालयात वेगळ्या आशेने डोळ्यांच्या माध्यमातून जनसंवाद साधला जात आहे. आणि तो साधतो आहे नरेंद्र. सत्यमेव जयते वॉटर कप पाणी फाऊंडेशनचे अकोला व बुलडाणा जिल्हा समन्वयक म्हणून नरेंद्र काकड काम पाहतोय. हसता हसता डोळ्यांच्या कला ओलावून टाकणारे नयनकटाक्ष व जलसंधारण चळवळीत पाणलोटबद्दलचे विविध उपचार नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी सांगतोय.

शेततळे, दगडी बांध, जाळीचा बांंध, माती नाला बांध, विहीर पुनर्भरण, कंटूर बांध, शोषखड्डे, वृक्षलागवड इत्यादीची माहिती नरेंद्र चक्क आपल्या डोळ्यांनी देतोय. पाणलोट उपचाराबाबत साध्या आणि सोप्या भाषेत डोळ्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहे. महाविद्यालयीन तरुण असो की, गावातील ग्रामस्थ यालाही डोळ्याची भाषा आपली वाटते व सहजपणे ते उपचार स्वीकारतात. आतापर्यंत अकोला व बुलडाणा जिल्ह्यात अनेक गावामध्ये जलसंधारणाची चळवळ राबविली आहे.

Web Title: 'Narendra' for Teaching on drought, Lessons in the eyes of water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.