कापूस वेचण्यास गेलेल्या महिलेचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:51am

जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला.

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव जामोद: आपल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या  महिलेचा अज्ञात आरोपीने खून करून पुरावा मिटविण्यासाठी एका  कोरड्या विहिरीत प्रेत टाकून त्यावर पालापाचोळा व माती लोटून पुरावा  नष्ट करण्याचा प्रयत्न गुरुवारी सायंकाळी तालुक्यातील आसलगाव  शिवारात घडून आला. याप्रकरणी जळगाव पोलिसांनी भादंविच्या कलम  ३0२, २0१ अन्वये गुन्हा नोंदविला असून, पोलीस पथक आरोपीचा शोध  घेत आहे. हरिभाऊ पंढरी इंगळे (वय ४६) आसलगाव यांनी दिलेल्या तक्रारीत असे  म्हटले आहे की, त्यांची पत्नी सुनीता (वय ३७) ही गावाला लागून  असलेल्या स्वत:च्या शेतात कापूस वेचण्याकरिता गेली असता सायंकाळी  ती शेतात नव्हती. कापसाचे गाठोडे व चपला शेताता होत्या. आजूबाजूच्या  शेतात शोध घेतला; परंतु सुनीता दिसून न आल्याने जळगाव पोलिसात  तक्रार दाखल केली. पोलिसांसमवेत तपास केला असता काही अंतरावर  असलेल्या एका कोरड्या विहिरीत सुनीताचे प्रेत दिसून आले. या प्रेतावर  पालापाचोळा व माती झाकलेली होती. सुनीताच्या शरीरावर जखमा होत्या.  यावरून आधी अज्ञात आरोपीने खून करून नंतर हे प्रेत विहिरीत टाकले  असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी वृत्त लिहीपर्यंत  कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकरणाचा तपास पोलीस  निरीक्षक प्रदीप साळुंके यांचे मार्गदर्शनाला सहायक पोलीस निरीक्षक  मानसिंग चव्हाण हे करीत आहे. 

संबंधित

‘एटीएम कार्ड’ तपासणीच्या नावाखाली दोघांची फसवणूक!
दुकानाचा बेकायदा ताबा; परस्परांविरुद्ध तक्रार
‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!
शेतकर्‍याची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍याविरुद्ध गुन्हा!
तोंडावर गुंगीची पावडर लावून दागिन्यासंह रोख लंपास!

बुलढाणा कडून आणखी

उदनापूर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालयात भरवली शाळा!
‘त्या’ अल्पवयीन मुलीचा गर्भपातादरम्यान मृत्यू!
शुकदास महाराज जयंतीनिमीत्य  हिवरा आश्रम येथे विज्ञान प्रदर्शनी
बुलडाणा : व्यवसाय प्रशिक्षण योजनेच्या अर्जासाठी २४ नोव्हेंबरची डेडलाईन
बुलडाणा नगर परिषद कार्यक्षेत्रातील बांधकाम परवानगी आता आॅनलाईन पध्दतीने

आणखी वाचा