नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:59 AM2018-05-29T00:59:25+5:302018-05-29T00:59:25+5:30

नांदुरा:  पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले.

Motorcycle on a bullock cart agitation! | नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा!

नांदुर्‍यात बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून मोर्चा!

Next
ठळक मुद्देइंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा:  पेट्रोल, डीझलचे उच्चांकी भाव, शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे व शेतमालास योग्य भाव देऊन त्वरित खरेदी याकरिता सोमवारी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे बैलगाडीवर मोटारसायकल ठेवून तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन सादर करण्यात आले.
सध्याचे पेट्रोल, डीझलचे भाव गगनाला भिडणारे असून, यामुळे वाहतूक खर्चात वाढ झाल्याने भाजीपाला, दूध, अन्नधान्यासह इतर वस्तूंचेही भाव वाढत असून, पेट्रोल, डीझल दरवाढीचा दुहेरी फटका सामान्य जनतेला बसत असून, तत्काळ भाववाढ कमी करावी. तसेच शासनाने घोषित केलेली कर्जमाफी अजूनही शेतकर्‍यांपर्यंत पोचली नसून, शासनाने शेतकर्‍यांची थट्टा, थांबवून त्वरित संपूर्ण कर्जमाफी करावी.  
पिकलेला शेतीमाल सध्या कवडीमोल विकल्या जात असल्याने संपूर्ण शेतमालास योग्य भाव देण्यात यावा व संपूर्ण शेतमालाची खरेदी शासकीय दराने करण्यात यावी. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते डॉ. प्रदीप हेलगे, मोहनराव पाटील, तालुका अध्यक्ष युवराज देशमुख, शहर अध्यक्ष नितीन मानकर, विनायक मुर्‍हे, संजय चोपडे, बाळासाहेब पाटील, मुकुंदराव मापारी, सुरेश शिंगोटे, महिला शहर अध्यक्ष गोदावरीताई जगदाळे, अनिरुद्ध पाटील, एकनाथ पाटील, अशोक पाटील, पहाडसिंग सुरडकर, अर्जुन ब्राह्मणे, भागवत बेलोकार, नीलेश भिसे, आकाश राजनकार, अनिल मानकर, पुरुषोत्तम तांबे, अतुल वानखडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आणि शेतकर्‍यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.     

शासनाचा निषेध!
शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकर्‍यांच्या विविध समस्यांकडे सातत्याने शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वारंवार आवाज उठविण्यात येत आहे. मात्र, तरीदेखील शासन स्तरावरून कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही. परिणामी, शासनाचा यावेळी निषेध करण्यात आला.
 

Web Title: Motorcycle on a bullock cart agitation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.