ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:53 AM2017-11-20T00:53:21+5:302017-11-20T00:58:10+5:30

बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे.

More than 400 online services to the villagers | ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

ग्रामस्थांना मिळणार ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा

Next
ठळक मुद्देवेळ, पैसा वाचणार ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू

हर्षनंदन वाघ । 
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ग्रामीण भागातील कुटुंबीयासह विद्यार्थ्यांचा वेळ व पैसा वाचावा या  दृष्टिकोनातून शासनाने ग्रामविकास विभागाच्या सेवांसह महसूल व इतर विभागाच्या  जवळपास ४00 पेक्षा जास्त ऑनलाइन सेवा एकाच छताखाली देण्याचे नियोजन  केले आहे. या उपक्रमाची सुरुवात १ नोव्हेंबरपासून करण्यात आली असून, जिल्ह्या तील ५00 ग्रामपंचायतींमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असून, उर्वरित ग्रामपंचाय तींमध्ये टप्प्या- टप्प्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
राज्यात यापूर्वी सन २0११ ते २0१५ या काळात संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र अर्था त संग्राम हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. आता या प्रकल्पाचा पुढील टप्पा  आपले सरकार सेवा केंद्र या नावाने पूर्णत्वाकडे जात आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत् पन्न १५ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा ग्रामपंचायतींना एकापेक्षा जास्त सेवा केंद्र  सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न १५  लाख किंवा १५ लाखपेक्षा कमी आहे, अशा ठिकाणी परिसरातील काही ग्राम पंचायतींचा गट तयार करून नागरिकांच्या सोयीच्या ठिकाणी सेवा केंद्र सुरू  करण्यात आले आहे. कमी उत्पन्न असतानाही ग्रामपंचायतीच्या इच्छेनुसार केंद्र स् थापन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील आपले सरकार केंद्राचे  वाढते कामकाज पाहता एकूण ८६९ ग्रामपंचायतींसाठी ६८५  केंद्र सुरू करण्यात  आली आहे. त्यापैकी ५00 ग्रामपंचायतींमध्ये ४00 पेक्षा अधिक दाखले देण्याची  अंमलबजावणी करण्यात आली आहे.  त्यात १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न  असलेल्या १२६ ग्रामपंचायती, १५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍या ४0५ तसेच  १४५ केंद्रात समावेश असलेल्या ३३९ ग्रामपंचातींचा समावेश करण्यात आला  आहे. 

केंद्रातून मिळणार्‍या सेवेमध्ये या दाखल्यांचा समावेश
ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन करणे, ११ आज्ञावलीमध्ये माहिती भरणे,  रहिवासी, जन्म-मृत्यू, नाहरकत, बांधकाम परवाना, जागेची नक्कल, विवाह  नोंदणी प्रमाणपत्र यांसह ३३ प्रकारचे दाखले देण्यात येतात. याबरोबरच महसूल  विभागासह इतर विभागाचे सुमारे ४00 पेक्षा जास्त सेवा ग्रामपंचायतींमधूनच उ पलब्ध होणार आहे.

Web Title: More than 400 online services to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.