शेतकऱ्यांभोवती सावकाराचा पाश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:40 PM2019-07-12T12:40:59+5:302019-07-12T12:44:07+5:30

स्थानिक सावकार तसेच इतर राज्यातील काही भांडवलदार खामगाव आणि परिसरात तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत.

Money lenders Loop around farmers! | शेतकऱ्यांभोवती सावकाराचा पाश!

शेतकऱ्यांभोवती सावकाराचा पाश!

Next
ठळक मुद्देदुष्काळी परिस्थिती तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकºयांजवळ पैसा नाही.बोटावर मोजण्याइतके सधन कास्तकार सोडले तर आर्थिक तंगीने पिचलेल्या शेतक-यांची संख्याच अधिक आहे. मालाचे हक्काचे पैसेही त्यांना मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा स्थानिक तसेच इतर राज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. काही सावकार तसेच बियाणे विक्री प्रतिनिधी बियाणांसोबतच पैसे देत, शेतकºयांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. खामगावसह परिसरात स्थानिक सावकार तसेच इतर राज्यातील बियाणे विक्री करणाºया प्रतिनिधींनी पाश आवळल्याच्या तक्रारी समोर येताहेत.
शेतकºयांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती पाहता, या शेतक-यांचा गैरफायदा घेण्यासाठी स्थानिक सावकार तसेच इतर राज्यातील काही भांडवलदार खामगाव आणि परिसरात तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. शेतातील पीक तारण घेवून पैसे वाटण्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असून शेतकºयांभोवती एक नवा पाश यानिमित्त्ताने आवळल्या जातोय. विशेष म्हणजे यातील काही जण बियाणे मार्केटिंगच्या निमित्तानेही  शेतक-यांशी संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे बोगस बियाणेही शेतकºयांच्या माथी मारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेली तीन-चार वर्षे असलेली दुष्काळी परिस्थिती तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकºयांजवळ पैसा नाही. बोटावर मोजण्याइतके सधन कास्तकार सोडले तर आर्थिक तंगीने पिचलेल्या शेतक-यांची संख्याच अधिक आहे. याला सरकारी धोरणही जबाबदार आहे. शेतकºयांच्या मालाचे हक्काचे पैसेही त्यांना मिळत नसल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.

कंपन्यांचे प्रतिनिधी परिसरात तळठोकून!
सध्या अनेक शेतकºयांकडे पैसाच शिल्लक नाही. जो-तो आपापल्या परीने जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यातील अवैध सावकार तसेच बियाणे विक्री करणाºया कंपन्यांचे प्रतिनिधी खामगावसह परिसरात तळ ठोकून असल्याचे दिसून येते.


पीक घेवून जाणार असल्याची अट!
आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या शेतक-यांना ते आपल्या पाशात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगदी पैसे देतांना शेतीमधील पीक तारण म्हणून मागत आहेत. हंगामात ठरलेल्या दराने पैसे परत केले नाही, तर  आलेले पीक घेवून जाणार असल्याच्या अटीवर हा व्यवहार करण्यात येत आहे.  


अस्पष्ट व्याज आकारणी!
शेतक-यांना भांडवलदारांकडून पैसे देण्यात येत असले, तरी त्यावर किती व्याज आकारण्यात येते, याबाबत स्पष्टता नाही. साधारणपणे १० ते १५ टक्के व्याज आकारण्यात येत असल्याचे समजते. शेतक-यांच्या शेतातील पीकच तारण असल्याने शेवटी जो हिशेब होईल, त्याप्रमाणे येणारी रक्कम ही शेतक-यांना द्यावीच लागणार आहे. हाताशी पैसा नसल्याने अनेक शेतकरी या सावकारीचे शिकार होत आहेत.
पिक तारण ठेवून कुणी शेतकºयांना धरत असल्यास, त्यांनी उपनिबंधक कार्यालयाकडे संबंधितांविरोधात तक्रारी कराव्यात. शेतकºयांच्या तक्रारींची योग्य ती दखल घेतली जाईल.
- एम.आर. कृपलानी
प्रभारी उपनिबंधक, खामगाव.

Web Title: Money lenders Loop around farmers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.