ठळक मुद्देआरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडीखोडतोड करून ९५ हजार ७२६ रूपयांची केली अफरातफर

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : येथील साई मेडीकलमध्ये नोकरीवर असलेल्या दोन  युवकांनी बिलांमध्ये खोडतोड करून ९५ हजार ७२६ रूपयांची  अफरातफर केल्याने चिखली पोलिसांनी ७ नोव्हेंबर रोजी  दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर  केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी  सुनावली आहे.
शहरात शिवशंकर त्र्यंबक खेडेकर यांचे साई मेडीकल आहे. या  मेडीकलमध्ये गजानन नगरमधील अविनाश अशोक खेडेकर व  आकाश देविदास केसकर हे दोघे गेल्या चार वर्षांपासून कामाला  होते.
 यादरम्यान या दोघांनी मेडीकलच्या संगणकीय बिलांमध्ये मोठय़ा  शिताफीने खोडतोड करून ९५ हजार ७२६ रूपयांची अफरातफर  केली. 
ही बाब मेडीकलचे मालक शिवशंकर खेडेकर यांच्या लक्षात  आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी  अविनाश खेडेकर व आकाश केसकर या दोघांविरूध्द कलम  ४0८, ४२0, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींना  अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने  दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.