निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाच्या कामास निकृष्टतेचे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:06 PM2019-05-18T16:06:27+5:302019-05-18T16:07:16+5:30

काळ्या मातीऐवजी पांढरीमाती, दगड आणि झाडांच्या मुळांची छानणी न करताच प्रकल्पात टाकल्यात आल्याने, या प्रकल्पाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.

Lower Dnyan Ganga project's work not upto standard | निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाच्या कामास निकृष्टतेचे ग्रहण!

निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाच्या कामास निकृष्टतेचे ग्रहण!

Next

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: तालुक्यातील निमकोहळा-काळेगाव येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्पाला निकृष्ट दर्जाचे ग्रहण लागल्याचे दिसून येते. परिणामी, प्रकल्प पूर्णत्वास येण्यापूर्वीच या प्रकल्पाच्या भींतीला तडे जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आर्हे. काळ्या मातीऐवजी पांढरीमाती, दगड आणि झाडांच्या मुळांची छानणी न करताच प्रकल्पात टाकल्यात आल्याने, या प्रकल्पाच्या दर्जाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत खामगाव तालुक्यात रोहणा परिसरात निम्न  ज्ञानगंगा-२ बृहत लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्णत्वास जात आहे. या प्रकल्पामुळे तालुक्यातील विविध गावांमधील तब्बल १ हजार १८१ जमिन सिंचनाखाली आणण्यास भविष्यात मदत होईल. मात्र, सुरूवातीच्या काळात भुसंपादन आणि त्यानंतर मोबदल्यावरून रखडलेला हा महत्कांक्षी प्रकल्प आता निकृष्ट दर्जाच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून येते. पूर्णपणे काळ्या मातीचा वापर करण्याऐवजी खडकाळ आणि दगड मिश्रीत मातीचा यामध्ये वापर करण्यात आल्याने, प्रकल्प पूर्णत्वास जाण्यापूर्वीच प्रकल्पाच्या भींतीवर तडे जात आहेत. काही ठिकाणी या प्रकल्पाच्या भींतीवर लावण्यात आलेले दगडही घसरले आहे. तसेच कॅनालचे बांधकाम करताना त्याच्या दर्जाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याने, हे कॅनाल कितीकाळ तग धरतील? असाही प्रश्न शेतकरीवर्गात उपस्थित होत आहे.
 


पुलाच्या भरावात मातीचा वापर!
निम्नं ज्ञानगंगा प्रकल्पातंर्गत रोहणा-काळेगावच्या मधातील पुलाची उंची वाढविण्यात आली आहे. या पुलानजीक दोन्ही बाजूला भराव टाकण्यासाठी सद्यस्थितीत खामगाव-बुलडाणा रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली. हा रस्ता बंद करण्यात आला आहे. दरम्यान, भराव टाकतानाही मुरूमाऐवजी मातीचा वापर करण्यात येत असल्याने पावसाळ्यात भरावही खचण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
भूसंपादन मोबदल्यावरून शेतकरी संतप्त!
प्रकल्प पूर्णत्वास जात असताना देखील निमकोहळा आणि परिसरातील काही शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत जमिनीचा मोबदला अदा करण्यात आला नाही. परिणामी, गत तीन आठवड्यापासून या प्रकल्पावर तणाव निर्माण झाला आहे. प्रकल्पाचे काम   शेतकऱ्यांनी बंद पाडल्याने पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.

 
निम्नं ज्ञानगंगा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्णपणे मातीचाच आहे. काही ठिकाणी तडे गेल्याची शक्यता नाकारता येत नाही. तडे गेलेल्या ठिकाणी दुरूस्तीचे संबंधितांना सुचविले आहे. प्रकल्पाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असे म्हणता येणार नाही.
- सुभाष पाटील 
विभागीय शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलडाणा.
 
निम्नं ज्ञानगंगा प्रकल्पाच्या कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. कॅनालचेही काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, प्रकल्पाच्या भींतीला निर्मितीपूर्वीच तडे गेलेत.
- मंगेशसिंग इंगळे
युवाशेतकरी, निमकोहळा ता. खामगाव.
 

Web Title: Lower Dnyan Ganga project's work not upto standard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.