Lok Sabha Election 2019: कर्मचारी करतील ‘इडीसी’द्वारे थेट केंद्रावर मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 06:11 PM2019-03-19T18:11:31+5:302019-03-19T18:11:50+5:30

निवडणूक आयोगाने १६ व्या लोकसभा निवडणुकीपासून ‘इडीसी’ (इलेक्शन ड्युटी सिर्टफिकेट) पद्धत राबविण्यास प्रारंभ केला आहे.

Lok Sabha Election 2019: Employees will vote directly through the 'EDC' polling center | Lok Sabha Election 2019: कर्मचारी करतील ‘इडीसी’द्वारे थेट केंद्रावर मतदान

Lok Sabha Election 2019: कर्मचारी करतील ‘इडीसी’द्वारे थेट केंद्रावर मतदान

Next

निवडणूक प्रक्रियेसाठी जवळास १८ हजार कर्मचारी लागणार
बुलडाणा: लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया निर्धाेक पारपाडण्यासाठी जिल्ह्यात सुमारे १८ हजार कर्मचारी जिल्ह्यात जवळपास व्यस्त आहेत. या वाढत्या व्यस्ततेमुळे प्रसंगी मतदान करण्याबाबत त्यांचात काहीसी अनास्था तथा बॅलेट पेपरसंदर्भातील तांत्रिक अचडणी पाहता या कर्मचार्यांचा मतदााचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने १६ व्या लोकसभा निवडणुकीपासून ‘इडीसी’ (इलेक्शन ड्युटी सिर्टफिकेट) पद्धत राबविण्यास प्रारंभ केला आहे. १७ व्या लोकसभेतही त्याची अंमलबजावणी होत असून मतदानाचा टक्का वाढविण्यास त्यामुळे मदत होणार आहे.
गेल्या काही काळापासून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होत आहे. त्यानुषंगाने निवडणूक आयोगाने स्वीप-१, स्वीप-२ सारखे उपक्रम राबवले होते. यासोबतच सर्वस्तरावर हा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इडीसी पद्धतीकडे पाहले जाते. आयोगानेही ही बाब गांभिर्याने घेत नागरिकांचा मतदानाचा टक्का वाढविण्यासोबतच निवडणूक कामात व्यस्त कर्मचार्यांचाही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न चालवले आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
पूर्वी पोस्टल बॅलेट जवानांसोबतच सामान्य कर्मचारी, निवडणूक कर्तव्यावरील कर्मचारी यांच्यासाठी होते. यंदा जवानांसाठी ईटीबीएस अर्थात इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटर पोल्सट बॅलेट ही पद्धत १७ व्या लोकसभेमध्ये लागू करण्यात आलेली आहे. तर १६ व्या लोकसभेत आणलेली इडीसी पद्धत यंदाही कायम आहे. यात लोकसभा मतदारसंघातंर्गत निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांसाठी ही पद्धत अवलंबवील्या जाणार आहे. यात निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, मतदान केंद्रावरील कर्मचारी, झोनल आॅफिसर, वाहन चालक, होमगार्ड, पोलिस, फोटोग्राफरसुद्धा या इडिसी पद्धतीने मतदान करू शकतील.
त्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचार्यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवडणूक कर्तव्यावर असल्याचे जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि यादी भाग क्रमांक तथा एक छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवून इडीसी प्रमाणपत्र घ्यावे व ज्या ठिकाणी त्यांना कर्तव्यावर देण्यात आलेले आहे तेथील मतदान केंद्रावर ओळख पटवणारी कागदपत्रे सोबतच इडीसी प्रमाणपत्र  दाखविल्यास त्या ठिकाणी त्यांना मतदान करता येईल.
दरम्यान, जिल्ह्यात जवळपास यंदा १८ हजारांच्या आसपास कर्मचारी निवडणूक कामामध्ये येत्या काळात व्यस्त राहण्याची शक्यता आहे. त्यांनाया इडीसी पद्धतीचा लाभ होण्याची शक्यता आहे. प्रशासनानेही त्यावर  गांभिर्याने पावले उचलणे आवश्यक आहे.

अशी आहे पद्धत
बुलडाणा शहरातील कर्मचारी खामगावमध्ये कर्तव्यावर आहे पण त्याची देऊळगाव राजा तालुक्यातील गावात निवडणुकीच्या कामासाठी ड्युटी लागली. अशा स्थितीत त्याने देऊळगाव राजा तालुक्यातील कुठल्याही मतदान केंद्रावर जावून निवडणूक कामासाठी झालेल्या नियुक्तीचा आदेश व ओळख पटविणारे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवल्यास त्याला तेथे मतदान करता येईल. तेथे त्याची मतदान केद्र अधिकारी नोंद घेऊन संबंधित कर्मचार्याच्या नावासमोर इडीसी नोंद करेल तर या कर्मचार्याच्या गावातील मतदान केंद्रावरील अधिकारीही  त्याच्या नावासमोर इडीसी लिहीणार असल्याने त्याच्या नावावर दुसरा कोणीही मतदान करू शकणार नाही.

हे करू शकतील मतदान
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले शासकीय कर्मचारी अशा पद्धतीने मतदान करू शकतील. मात्र निवडणुकीच्या कामासाठी असलेले खासगी छायाचित्रकार, वाहन चालक, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांच्या बाबतही अनुषंगीक विषयान्वये स्पष्टता होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2019: Employees will vote directly through the 'EDC' polling center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.