चाईल्ड लाईनकडून विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 08:29 PM2017-11-26T20:29:49+5:302017-11-26T20:32:32+5:30

चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या संचालिका जिजाताई चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गुरूजी कन्या शाळेमध्ये चाईल्ड लाईनकडून २४ नोव्हेंबर रोजी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे देण्यात आले.

Lessons for students from Child Line | चाईल्ड लाईनकडून विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे

चाईल्ड लाईनकडून विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे

googlenewsNext
ठळक मुद्देबुलडाणा चाईल्ड लाईनचा जाणीव जागृती कार्यक्रम१0९८ या टोलफ्री क्रमांकासंदर्भात दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : चाईल्ड लाईन प्रकल्पाच्या संचालिका जिजाताई चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गुरूजी कन्या शाळेमध्ये चाईल्ड लाईनकडून २४ नोव्हेंबर रोजी जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थीनींना सुरक्षीततेचे धडे देण्यात आले.
यावेळी बुलडाणा चाईल्ड लाईन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेप, प्रकल्प समुपदेशक स्वाती काळे, टिम मेंबर अमोल पवार, फुलचंद वायकोस, संध्या घाडगे, जया राजगुरे, प्रविण गवई, शितल दांदडे तसेच शिंदे गुरूजी कन्या शाळेचे मुख्याध्यापिका संजीवनी शेळके, शिक्षक राजेंद्र सिरसाट, एम.ए.गवई, आर.के.म्हस्के, एम.पी.मोरे इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संध्या घाडगे यांनी केले. समस्याग्रस्त मुले बुलडाणा जिल्ह्यात कुठेही आढळल्यास आपण १०९८ या टोलफ्री क्रमांकावर फोन करून त्याची मदत करा, असे आवाहन जया राजगुरे यांनी केले. त्यानंतर चाईल्ड लाईन १०९८ प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक शेख सोहेप यांनी उपस्थित सर्व मुलींना चाईल्ड लाईन १०९८ बुलडाणा येथील शोषीत मुलासंदर्भातील कामातील अनुभव व्यक्त करून सुशिक्षीत व असुरक्षित स्पर्श कसे ओळखावे व आपल्याला कोणी वाईट उद्देशाने स्पर्श करत असेल तर आपण आपला बचावत्यापासून कसा केला पाहिजे व चाईल्ड लाईनला कशा प्रकारे मदत मागितली पाहिजे, असे मार्गदर्शन शेख सोहेप यांनी कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजीवनी शेळके यांनी तर आभार प्रदर्शनएम.पी.मोरे यांनी केले.

Web Title: Lessons for students from Child Line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.