बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 06:27 PM2017-11-17T18:27:13+5:302017-11-17T18:29:09+5:30

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leakage to water bodies in Buldhana district: 35 to 40 percent water scarcity | बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

बुलडाणा जिल्ह्यात जलवाहिन्यांना गळती: ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य 

Next
ठळक मुद्देगळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

बुलडाणा :  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईवरील लिकेज वाढल्यामुळे ३५ ते ४० टक्के पाण्याचा अपव्य होत आहे. पाणीपुरवठा योजनांच्या गळतीचे आॅडीट करण्याची गरज निर्माण झाली आहे.
एकीकडे जिल्हयातील प्रकल्पामध्ये तुनेने अल्प जलसाठा आहे. नागरी व ग्रामीण भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणार्या प्रकल्पावरून अवैध पाणी उपसा होत असल्यास थेट फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्र्यांच्या सुचनेवरून दिलेले आहेत. अशा स्थितीत योजनांच्या जलवाहिनीवरील लिकेजेसमुळेच जादा पाणी वाया जाणे संयुक्तीक नाही. निकषनुसार साधारणत: १५ ते २० टक्के लिकेजेस जलवाहिन्यावर असतात. त्यामुळे जलवाहिन्यावरील व्हॉल दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.  त्यामुळे ग्रामीण भागात तथा शहरी भागात प्रसंगी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी हे नागरी भागातील साडेपाच लाख लोकांना आगामी काळात पुरणारे आहे. मात्र गळतीमुळे होणार्या पाण्याचा अपव्य पाहता प्रसंगी यात कमतरता येण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र आहे.
 जिल्ह्यातील विविध शहरासह बुलडाणा शहराला पाणीपुरवठा करणाºया पाईपलाईनवर विविध ठिकाणी लिकेज असल्यमुळे पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया दिवसात वाढ होते. या परिस्थितीमुळे अनेकवेळा नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. जवळपास दीड लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा शहराला येळगाव येथील स्व. भोंडे जलाशयातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी धरणापासून ते शहरातील पाण्याच्या टाकी पर्यत पाईप लाईन टाकण्यात आली आहे. परंतु या पाईप लाईनवरील अनेक वॉल लिकेज झाले आहेत. दररोज वॉल व या पाईप लाईन मधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे हे पाणी काही नागरिकांच्या अंगणात शिरले असल्यामुळे अंगणाला डबक्याचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

Web Title: Leakage to water bodies in Buldhana district: 35 to 40 percent water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.