जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 01:55 PM2019-06-17T13:55:37+5:302019-06-17T13:55:45+5:30

भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत राजकीय डावपेच शिकलेल्या आ. संजय कुटे यांंनी २००४ मध्ये प्रथमत: विधानसभा निवडणूक लढवत सातत्यपूर्ण आपला चढता राजकीय आलेख कायम ठेवला आहे.

Land Developer to Cabinet Minister: Political journey of Sanjay Kute | जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास

जमीन विकासक ते कॅबीनेट मंत्री: डॉ. संजय कुटे यांचा प्रवास

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: व्यवसायाने डॉक्टर असतानाच जमीन विकासक अर्थात लॅन्ड डेव्हलपर्स म्हणून जळगाव जामोद मध्ये जम बसविलेल्या आ. डॉ. संजय कुटे यांचा राजकारणातील प्रवेशही अनपेक्षीत आहे. जमीन विकासक म्हणून मिळालेल्या यशानंतर राजकीय आकांक्षा पल्लवीत झालेल्या आ. डॉ. संजय कुटे यांनी प्रथमत: २००० साली राजकारण प्रवेश केला. भाजपचे सक्रीय पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करतानांनाच बुलडाणा जिल्ह्यातील भाजपचे आधारस्तंभ असलेले माजी कृषी मंत्री कै. भाऊसाहेब फुंडकर यांच्या तालमीत राजकीय डावपेच शिकलेल्या आ. संजय कुटे यांंनी २००४ मध्ये प्रथमत: विधानसभा निवडणूक लढवत सातत्यपूर्ण आपला चढता राजकीय आलेख कायम ठेवला आहे.
रविवारी बुलडाणा जिल्ह्यातील चौथे कॅबीनेट मंत्री म्हणून त्यांनी मुंबईत शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा गेल्या १९ वर्षाचा राजकीय जीवनपट प्रकर्षाने समोर आला. आपल्या राजकीय जीवनाची पहिली पायरी चढल्यानंतर त्यांनी आजपर्यंत मागे वळून पाहले नाही. तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी समय सुचकता, संघटन कौशल्याची चुणूक दाखवत सर्वांना प्रभावीत केले होते. २०१२ मध्ये जळगाव जामोद तालुक्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांना हॉल टिकीट न मिळाल्यामुळे बारावीचा इंग्रजीचा पेपर बुडाला होता. त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करून विधीमंडळात आवाज उठवला होता. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याच्या दृष्टीने प्रथमच इंग्रजी पेपर देण्यापासून वंचित असलेल्या ३२ विद्यार्थ्यांना हा पेपर देता आला. खारपाणपट्यात येणाऱ्या व ते प्रतिनिधीत्व करणाºया जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात किडणीच्या आजाराने मृृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा विषय जिवनदायी योजनेत महत प्रयासाने त्यांनी समाविष्ट करून घेतला. आज विधी मंडळातील विविध समित्यांवर ते सदस्य असून आत्महत्याग्रस्त बुलडाणा जिल्ह्यातील शेतकºयांच्या मुलींचे लग्न लावून देत त्यांनी स्वत: कन्यादान केले.
खारपाणपट्यातील १४० गावांना शुद्ध आरोचे पाणी मिळावे यासाठी २२२ कोटी रुपयांची जळगाव जामोद व १४० गावे पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली. यासोबतच सिंचनाला महत्त्व देत कुºहा वडोदा, इस्मापूर उपसा योजना मंजूर केल्या.
 
सिंचन सुविधांसाठी प्रयत्न
अवघ्या १९ वर्षाच्या राजाकीय वाटचालीत त्यांनी आतापर्यंत आपला यशाचा आलेख चढता ठेवलेला आहे. २००४, २००९ आणि २०१४ मध्ये त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. दरम्यान शेतकºयांच्या प्रश्नावरही त्यांनी काम केले असून शेती सिंचनाच्या दृष्टीने सातत्यपूर्ण त्यांनी मुद्दा लावून धरला आहे. त्यादृष्टीने एक हजार ५०० कोटी रुपायंची कुºहा वडोदा, इस्मापपूर उपसा सिंचन योजना, चौंढी, आलेवाडी आणि अर कचेरी उपसा सिंचन योजनां प्रत्यक्षात आकारात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. याद्वारे परिसरातील ३० हजार हेक्टरवर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
सलग दुसºयांदा आमदार
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना २००९ साली त्यांनी पुन्हा भाजपचे आमदार म्हणून विधीमंडळात प्रवेश केला. त्यांच्या याच कारकीर्दीदरम्यान २०१० मध्ये त्यांना भाजपचे जिल्हाध्यक्षपदही बहाल करण्यात आले. याच कालावधीत त्यांनी विविध आंदोलनेही केलीत.

पूर्ण वेळ भाजप सदस्य
भाजपाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून २००० सालापासून आ. संजय कुटे यांनी कामास प्रारंभ केला. २००३ पर्यंत त्यांनी हे काम केल्यानंतर त्यांच्यातील नेतृत्व गुण हेरत त्यांना तालुकाध्यक्ष बनविण्यात आले.

जळगाव जामोद विधानसभेची निवडणूक लढवत ते प्रथमच आमदार झाले.

२०१४
सलग तिसºयांदा ते जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून निवडून आले. प्रारंभापासूनच त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागणार अशी चर्चा होती. प्रदेशाध्यक्ष पदासाठीही त्यांचे नाव चर्चेत होते.
तीन ते साडेतीन वर्षे मंत्रीमंडळात त्यांचा समावेश होण्याची चर्चा प्रत्यक्षात उतरली. १६ जून २०१९ रोजी त्यांनी कॅबीनेट मंत्री म्हणून मुंबईत शपथ घेतली. भाजपचे पूर्णवेळ सदस्य म्हणून २००० साली राजकीय प्रवास सुरू करणारे आ. डॉ. संजय कुटे यांनी सलग तीन वेळा जळगाव जामोदचे प्रतिनिधीत्व करत स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच आदिवासी पट्ट्यातील या मतदार संघाला त्यांच्या रुपाने कॅबीनेट मंत्रीपद मिळवून दिले.

Web Title: Land Developer to Cabinet Minister: Political journey of Sanjay Kute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.