ठळक मुद्दे शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. दरम्यान काही धावत्या वाहनांवर दगडफेक झाल्याने नागरिक भयभित झाले होते.आंदोलनदरम्यान दुखापत झालेल्या दोन कार्यकर्त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 


खामगाव : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहरासह तालुक्यात कळकळीत बंद पाळण्यात आला. दरम्यान कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासह शहरातील बंद दुकानांची तोडफोड केली. शहरात सर्वत्र तणावाचे वाातावरण असून पोलिसांकडून काही भागात सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. 


खामगाव शहरात चार दुकानासह, पाच ते सहा वाहने फोडण्यात आली. रस्त्याने जाणाऱ्या दुचाकी स्वारांना थांबवून काही वाहनांची तोडफोडीच्या घटना उघडकीस आल्या. दरम्यान शहरातील विविध मार्गावरुन समाजबांधवासह विविध पक्षाच्या पदाधिकाºयांनी शांततेचे आवाहन केले. उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देवून भीमा कोरेगाव येथील जाळपोळ प्रकरणाचा तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. बसस्थानकावर शांतता होती. दरम्यान काही धावत्या वाहनांवर दगडफेक झाल्याने नागरिक भयभित झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आंदोलनदरम्यान दुखापत झालेल्या दोन कार्यकर्त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. 

वैद्यकीय अधिक्षक गैरहजर 
जिल्हा सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण विभाग सुरु होता. मात्र वैद्यकीय अधिक्षक डॉ. शंकरराव वानखडे यांची अनुपस्थिती आढळून आली. संवेदनशील परिस्थिती सुद्धा वैद्यकीय अधिक्षक गैरहजर असल्याने कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. शहरातील खासगी दवाखाने व मेडीकल सुद्धा बंद दिसून आली. त्यामुळे रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. 

महामार्गावर रास्तारोको 
नांदुरा, मलकापूर येथून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. यामुळे वाहनांची दहा किलोमिटर पर्यंत वाहनांची रांग लागली होती. पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. 

 


बच्चेकंपनींनी घेतला सुटीचा आनंद 
शहरातील शाळा, महाविद्यालयांना सुटी होती. त्यामुळे चिमुकले अंगणात, घरासमोरील खुल्या मैदानात खेळतांना दिसून आली. 


संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षाचे कार फोडली 
संभागी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष रवी महाले यांची कार खामगावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ फोडली. मात्र रवी महाले यांनी शांततेने प्रकरण हाताळले.