खामगाव : ढेप घेऊन जाणारा ट्रक जळून खाक! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 01:48 AM2018-04-24T01:48:29+5:302018-04-24T01:48:29+5:30

खामगाव : खामगाव येथून ढेप घेऊन चिखलीकडे जाणारा ट्रक अपघातानंतर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी गारडगाव-लोखंडा फाट्यावर घडली. 

Khamgaon: The truck carrying the lamps burned down! | खामगाव : ढेप घेऊन जाणारा ट्रक जळून खाक! 

खामगाव : ढेप घेऊन जाणारा ट्रक जळून खाक! 

Next
ठळक मुद्देखामगाव-चिखली मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव येथून ढेप घेऊन चिखलीकडे जाणारा ट्रक अपघातानंतर जळून खाक झाल्याची घटना सोमवारी दुपारी गारडगाव-लोखंडा फाट्यावर घडली. 
ट्रक क्रमांक एमएच ११ एएल ४५९५ हा आज दुपारी शहरातून माल भरुन चिखलीकडे जात असताना गारडगाव-लोखंडा फाट्याजवळ सदर ट्रक अपघातग्रस्त होऊन जागेवरच जळून खाक झाला. वृत्त लिहेपर्यंत सदर ट्रकच्या अपघाताबाबत येथील ग्रामीण पोलिसांकडे कुठलीच तक्रार अथवा माहिती उपलब्ध नव्हती. विशेष म्हणजे रविवारी याच रोडवर हिवरखेड फाट्याजवळ ढेप घेऊन जाणार्‍या एका ट्रकला आग लागली होती. ट्रकला आग लागण्याची ही सलग दुसरी घटना आहे.

Web Title: Khamgaon: The truck carrying the lamps burned down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.